राजस्थान पोलिसांच्या सीआयडी (इंटेलिजन्स) विभागाने ३० जून २०२६ रोजी रफीक चाँद शेख (वय ४१) याला अटक केली असून तो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील हर्सूल येथील रहिवासी असून तो फॉरेक्स ट्रेडिंग करतो. रफीक शेखला २ जुलै २०२६ रोजी जयपूर येथील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला ७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या कालावधीत त्याची सखोल चौकशी केली जाणार आहे.
रफीक शेखला सूचना देणारा व्यक्ती isi चा नेता असल्याचा संशय.
त्याने सुमित कुमार (आसाममधील चाबुआ येथील हवाई दलाचा कर्मचारी) याला ५ ऑनलाइन व्यवहारांतून ७०,००० रुपये हस्तांतरित केले. या व्यवहारासाठी त्याने ३% कमिशन (सेवा शुल्क) घेतल्याचे तपासात आढळले आहे. तो डबई-आधारित व्यक्तीच्या संपर्कात होता, ज्याने त्याला क्रिप्टोकरन्सी (यूएसडीटी) व्यवहारांतून पैसे हस्तांतरित करण्याच्या सूचना दिल्या. ही व्यक्ती स्वतःला व्यावसायिक म्हणवत असली तरी ती आयएसआयचा पुढारी असल्याचा संशय आहे.
या प्रकरणात या आधी दोन जणांना अटक
झबरा राम (जैसलमेर, राजस्थान) – याला जानेवारी २०२६ मध्ये अटक करण्यात आली. सुमित कुमार (आसाममधील दिब्रुगड येथील एअर फोर्स स्टेशनचा मल्टी-टास्किंग स्टाफ) – याला २२ मार्च २०२६ रोजी अटक करण्यात आली. या दोघांवर भारतीय लष्कर आणि हवाई दलाची गोपनीय माहिती आयएसआयला पुरवल्याचा आरोप आहे.
रफीक शेखची कबुली
चौकशीत रफीक शेखने खालील बाबी कबूल केले कि गेल्या चार वर्षांपासून आयएसआयच्या हँडलरच्या संपर्कात होता. त्याने सोशल मीडियाद्वारे सूचना प्राप्त केल्या आणि त्यानुसार स्वतःच्या तसेच इतरांच्या नावाने अनेक बँक खाती उघडली. या खात्यांतून त्याने हेरगिरीतील सहभागी व्यक्तींना पैसे पाठवले.
सीआयडी इंटेलिजन्सचा तपास सुरु
रफीक शेखचे मोबाईल फोन, सोशल मीडिया खाती, इलेक्ट्रॉनिक उपकरणे यांची फॉरेन्सिक तपासणी करत आहे. इतर संशयित बँक खाती, आर्थिक व्यवहार आणि संभाव्य साथीदार यांचा सुधा तपास सुरु आहे. तपासात अद्याप रफीक शेखला हेरगिरीच्या कारवायांची माहिती असल्याचा थेट पुरावा मिळालेला नाही, परंतु आर्थिक व्यवहारांची साखळी उघड करण्यावर भर आहे.















