• Home
  • Beed
  • बॅनर फाडल्याच्या कारणावरून तरुणाची हत्या
Image

बॅनर फाडल्याच्या कारणावरून तरुणाची हत्या

बीडच्या केज तालुक्यात खळबळ

बीड, प्रतिनिधी: राज्यात वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमध्ये बीड जिल्ह्याचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. जिल्ह्यातील केज तालुक्यात बॅनर फाडल्याच्या शुल्लक वादातून एका तरुणाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, केज तालुक्यातील टाकळी येथील विलास घुले या तरुणाची कदमवाडी फाटा परिसरातील हॉटेल गावकरी येथे रात्रीच्या सुमारास चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. बॅनर फाडल्याच्या किरकोळ कारणावरून हा वाद झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

या घटनेनंतर संतप्त नातेवाईक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने केज पोलीस ठाण्यात दाखल झाले. आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, केज येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ग्रामस्थ व नातेवाईकांनी दोन वेळा रास्ता रोको आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. संबंधित आरोपींविरुद्ध कारवाईची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास केज पोलीस करत आहेत.

बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने गुन्हेगारीच्या घटना समोर येत असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Related Posts

रविवारीही बँका सुरू, ३ दिवसांच्या देशव्यापी बँक संपापूर्वी सरकारचा मास्टरस्ट्रोक.

बँक कर्मचारी संघटनांनी २८ ते ३० सप्टेंबर २०२६ दरम्यान तीन दिवसांच्या देशव्यापी संपाची हाक दिल्यानंतर, ग्राहकांना दिलासा देण्यासाठी…

ByByrushikesh Sep 24, 2026

धाराशिवमध्ये पवन ऊर्जा प्रकल्पांना चोरीचा मोठा फटका; ८ महिन्यांत २० कोटींचे साहित्य चोरीस, प्रकल्प वर्षभर लांबणीवर

धाराशिवमधील पवन ऊर्जा प्रकल्पांमध्ये ८ महिन्यांत २० कोटींचे साहित्य चोरीस गेल्याने प्रकल्प एक वर्ष लांबले. चोरी आणि तोडफोडीमुळे…

ByByrushikesh Sep 24, 2026

धन-धान्य योजनेत छत्रपती संभाजीनगरचा डंका! महाराष्ट्रात अव्वल, देशातील टॉप-१० मध्ये

कमी कृषी उत्पादकता, अपुरी सिंचन आणि पतपुरवठ्यातील अडचणी दूर करण्यासाठी केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘पंतप्रधान धन-धान्य कृषी योजने’त छत्रपती…

ByByrushikesh Sep 24, 2026

स्थानिक तरुणांना थेट एथरमध्ये करिअरची संधी! बिडकीन EV प्रकल्पासाठी ४ नामांकित संस्थांसोबत मोठा करार

एथर एनर्जीच्या बिडकीन DMIC प्रकल्पात पुढील वर्षी सुरू होणाऱ्या उत्पादनासाठी स्थानिक कुशल मनुष्यबळ उभारण्याच्या उद्देशाने ICEEM, ISIEINDIA, यशोदीप…

ByByrushikesh Sep 24, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top