• Home
  • Breaking News
  • मुंबईतील सहा नामांकित हॉटेलवर FDA धाड, हॉटेलचे परवाने रद्द…
Image

मुंबईतील सहा नामांकित हॉटेलवर FDA धाड, हॉटेलचे परवाने रद्द…

आयुक्त तुकाराम मुंढे यांची नामांकित उद्योग समूहाच्या हॉटेलवर कारवाई…

एफडीएने २७ जून रोजी नरिमन पॉइंट येथील ‘फ्लिंट अँड वार्सा’ या रेस्टॉरंटची तपासणी केली. तपासणीदरम्यान अन्नपदार्थांच्या चुकीच्या ब्रँडिंगचे प्रकार आढळून आले, नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांनी त्या रेस्टॉरंटचा परवाना निलंबित केला. हे रेस्टॉरंट आदित्य बिर्ला समूहाशी संबंधित असल्याची माहिती मिळाली आहे.

राज्यभरात अन्न व औषध प्रशासन (FDA)  IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली मोहीम राबवत आहे. याचाच भाग म्हणून मुंबईतील सहा नामांकित हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि बेकरींवर FDA ने काल धाड टाकत धडक कारवाई केली आहे. तिथे त्यांना अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळून आले आणि प्रशासनाने लगेच या सगळ्या हॉटेल वर कारवाई करत त्यांचे परवाने निलंबित केले आहेत.

कोणत्या कोणत्या हॉटेल्सवर झाली कारवाई?

त्यानंतर बोरीवली येथील एम. के. बेकरीवरही कारवाई करण्यात आली. येथे त्या बेकरीच्या जागेचे बांधकाम सुरू असतानाच इथे खाद्यपदार्थ बनवत असल्याचे आढळून आले. तसेच तिथे मोठ्या प्रमाणात अस्वच्छता असल्याचे प्रशासनाच्या नजरेस आले, त्यामुळे या बेकरीचा परवानाही निलंबित करण्यात आला. याशिवाय भांडुप, सांताक्रूझ आणि वांद्र्यातील काही हॉटेलवर कारवाई करण्यात आली आहे.

बंटी-बबली फेक FDA अधिकारी सांगून हॉटेल मालकाला धमकावण्याचा प्रयत्न

दरम्यान, FDA अधिकारी असल्याचे सांगत बोरिवलीमधील आहार हॉटेलवर धाड टाकण्याची घटना समोर आली आहे. ‘बंटी’ आणि ‘बबली’ या नावांच्या दोन व्यक्तींनी स्वतःला FDA अधिकारी सांगत हॉटेलमध्ये प्रवेश केला. त्यांनी हॉटेल मालकाकडे अन्न नमुने तपासणीच्या नावाखाली कारवाईची धमकी दिली. ‘फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ची बनावट ओळखपत्रे सुधा होते. पण त्यांच्या वागण्या बोलण्यावरून हॉटेल मालकाला संशय आला आणि त्याने तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला. बनावट अधिकारी असल्याच्या संशयावरून या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ग्राहकांना मोफत पिण्याचे पाणी देणे बंधनकारक

तुकाराम मुंढे यांचे हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सला आदेश दिले आहेत कि ग्राहकांना शुद्ध आणि सुरक्षित पिण्याचे पाणी मोफत उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. तसेच हॉटेलमध्ये प्रवेश करताना ग्राहकांना ही सुविधा असल्याचा बोर्ड समोर लावणे आवश्यक आहे. जर ग्राहकाने बाटलीबंद पाणी मागितले तरच ते देण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

नागरिकांना तक्रारीसाठी टोल-फ्री क्रमांक

अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत किंवा सुरक्षेबाबत काही शंका असल्यास नागरिकांनी त्वरित तक्रार नोंदवावी, असे आवाहन FDA ने केले आहे. यासाठी १८००२२२३६५ हा टोल-फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. या क्रमांकावर नागरिक आपल्या तक्रारी नोंदवू शकतात.

Related Posts

मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय! लाऊडस्पीकर वाजवायचा असेल तर मंडळांना जमा करावे लागणार 1 लाख रुपये

मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! लाऊडस्पीकर वापरण्यासाठी मंडळांना 1 लाख रुपयांची अनामत रक्कम भरावी लागणार मुंबई: गणेशोत्सवासह सर्व…

ByByrushikesh Sep 24, 2026

‘नो युपीआय डे’: 2 ऑक्टोबरला क्यूआर कोड काळ्या कापडाने झाकणार; महाराष्ट्रासह देशभरातील 500 हून अधिक व्यापारी संघटना आंदोलनात

एमडीआर शुल्काच्या विरोधात देशभरातील व्यापारी संघटनांचे आंदोलन; गांधी जयंतीला क्यूआर कोड काळ्या कापडाने झाकून ‘गांधीगिरी’चा मार्ग मुंबई: युपीआय…

ByByrushikesh Sep 24, 2026

धाराशिवमध्ये पवन ऊर्जा प्रकल्पांना चोरीचा मोठा फटका; ८ महिन्यांत २० कोटींचे साहित्य चोरीस, प्रकल्प वर्षभर लांबणीवर

धाराशिवमधील पवन ऊर्जा प्रकल्पांमध्ये ८ महिन्यांत २० कोटींचे साहित्य चोरीस गेल्याने प्रकल्प एक वर्ष लांबले. चोरी आणि तोडफोडीमुळे…

ByByrushikesh Sep 24, 2026

फॉर्म ६ मध्ये बेकायदेशीर बदल? दोन निवडणूक आयुक्तांनी घेतला आक्षेप, नवमतदारांना मनस्तापाची भीती

नवीन मतदार नोंदणीसाठी वापरल्या जाणाऱ्या फॉर्म ६ मध्ये SIR शी संबंधित तीन प्रश्न जोडले; ऐच्छिक असूनही उत्तर दिल्याशिवाय…

ByByrushikesh Sep 24, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top