• Home
  • Beed
  • बीड विलास घुले खून प्रकरण: खासदार पुत्राच्या अटकेसाठी घुले कुटुंबाचा आमरण उपोषणाचा इशारा
Image

बीड विलास घुले खून प्रकरण: खासदार पुत्राच्या अटकेसाठी घुले कुटुंबाचा आमरण उपोषणाचा इशारा

बीडमधील विलास घुले हत्या प्रकरणी खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरव सोनवणे याच्या अटकेसाठी घुले कुटुंबीयांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा धोका. न्यायासाठी कुटुंबाचा टोकाचा इशारा.

बीडमध्ये विलास घुले हत्या प्रकरण पुन्हा तापले; खासदार पुत्राच्या अटकेसाठी कुटुंबीयांचा आमरण उपोषणाचा इशारा

बीडमधील बहुचर्चित विलास घुले हत्या प्रकरणाने पुन्हा एकदा तापदायक वळण घेतले आहे. खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरव सोनवणे याच्यावर गंभीर आरोप करत घुले कुटुंबीयांनी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. न्याय न मिळाल्यास आत्महत्येचा इशारा देत कुटुंबाने प्रशासनाला सक्त भूमिका घेण्यास भाग पाडले आहे.

४० दिवसांनंतरही न्यायाची वाट

मयत विलास घुलेच्या आईने भावनिक भूमिका मांडताना सांगितले की, “आज माझा मुलगा जाऊन ४० दिवस झाले, मात्र अद्याप न्याय मिळाला नाही. पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली नाही.” त्यांनी पुढे निवेदन दिले की, न्याय मिळावा म्हणून ते मुंबईत सहा दिवस थांबले होते, मात्र प्रशासनाने त्यांच्या निवेदनाची दखल घेतली नाही. “तुम्ही दुसऱ्या १०० जणांना अटक केली तरी काय उपयोग? तुम्ही मुख्य आरोपीला आम्हाला मारायला बाहेर ठेवलय का?” असा तीव्र सवालही त्यांनी उपस्थित केला.

घुले कुटुंबाचा टोकाचा इशारा

विलास घुलेच्या भावानेही तीव्र नाराजी व्यक्त केली. “मी अनेक वेळा सांगितले आहे की माझा भाऊ जखमी असताना त्याने सौरव सोनवणे याचे नाव घेतले आहे. त्यानेच हे करायला सांगितले, असे विलास म्हणाला. जे साक्षीदार आहेत त्यांनीही आपल्या जबाबात नावे दिली आहेत. मग पोलीस का कारवाई करत नाहीत?” असा संतप्त प्रश्न त्यांनी केला. न्याय न मिळाल्यास कुटुंब आत्महत्या करेल, असा टोकाचा इशाराही त्यांनी दिला आहे.

सरपंचाचाही आक्रमक पवित्रा

दरम्यान, घुले यांच्या टाकळी गावाच्या सरपंचानेही आक्रमक भूमिका घेतली आहे. “जोपर्यंत घुले कुटुंबाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाहीत,” असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. तसेच, “मुख्यमंत्र्यांनी एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला दुसरा न्याय असे करू नये. लहान जात असल्यामुळे न्याय मिळणार नाही का?” असा सवालही त्यांनी केला.

विलास घुले प्रकरण काय आहे ?

उल्लेखनीय म्हणजे, केज तालुक्यातील टाकळी येथील हॉटेल व्यावसायिक विलास घुले यांची २० जून रोजी चाकूने निर्घृण हत्या करण्यात आली होती. विवादामध्ये मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या घुले यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत दहा आरोपींना अटक केली आहे. मात्र, विलास घुले यांचे बंधू रमेश घुले यांनी पुरवणी जबाबात खासदार बजरंग सोनवणे यांचे पुत्र सौरव सोनवणे यांच्या सहभागाबाबत संशय व्यक्त केला आहे. यापूर्वी विशेष तपास पथकाने (SIT) सौरव सोनवणे यांची चार तास कसून चौकशी केली होती.

तपास सीआयडीकडे

दरम्यान, या संवेदनशील प्रकरणाचा तपास आता विशेष तपास पथकाकडून (SIT) राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (CID) वर्ग करण्यात आला आहे. पोलिसांनी आतापर्यंत सात आरोपींना अटक केली आहे, तर उर्वरित दोघांचा शोध सुरू आहे. मात्र, घुले कुटुंबाची मागणी आहे की खासदार पुत्रालाही आरोपी करून अटक करावी.

सद्यस्थितीत बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचा आमरण उपोषणाचा सत्याग्रह सुरू असून, प्रशासनासमोर न्यायाचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे.

Related Posts

मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय! लाऊडस्पीकर वाजवायचा असेल तर मंडळांना जमा करावे लागणार 1 लाख रुपये

मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! लाऊडस्पीकर वापरण्यासाठी मंडळांना 1 लाख रुपयांची अनामत रक्कम भरावी लागणार मुंबई: गणेशोत्सवासह सर्व…

ByByrushikesh Sep 24, 2026

‘नो युपीआय डे’: 2 ऑक्टोबरला क्यूआर कोड काळ्या कापडाने झाकणार; महाराष्ट्रासह देशभरातील 500 हून अधिक व्यापारी संघटना आंदोलनात

एमडीआर शुल्काच्या विरोधात देशभरातील व्यापारी संघटनांचे आंदोलन; गांधी जयंतीला क्यूआर कोड काळ्या कापडाने झाकून ‘गांधीगिरी’चा मार्ग मुंबई: युपीआय…

ByByrushikesh Sep 24, 2026

धाराशिवमध्ये पवन ऊर्जा प्रकल्पांना चोरीचा मोठा फटका; ८ महिन्यांत २० कोटींचे साहित्य चोरीस, प्रकल्प वर्षभर लांबणीवर

धाराशिवमधील पवन ऊर्जा प्रकल्पांमध्ये ८ महिन्यांत २० कोटींचे साहित्य चोरीस गेल्याने प्रकल्प एक वर्ष लांबले. चोरी आणि तोडफोडीमुळे…

ByByrushikesh Sep 24, 2026

फॉर्म ६ मध्ये बेकायदेशीर बदल? दोन निवडणूक आयुक्तांनी घेतला आक्षेप, नवमतदारांना मनस्तापाची भीती

नवीन मतदार नोंदणीसाठी वापरल्या जाणाऱ्या फॉर्म ६ मध्ये SIR शी संबंधित तीन प्रश्न जोडले; ऐच्छिक असूनही उत्तर दिल्याशिवाय…

ByByrushikesh Sep 24, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top