• Home
  • sports
  • लेकरांचा बाप असलेल्या युवकाने काढली सतरा वर्षाच्या तरुणीची छेड. पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
Image

लेकरांचा बाप असलेल्या युवकाने काढली सतरा वर्षाच्या तरुणीची छेड. पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

छत्रपती संभाजीनगर, मराठवाडा अपडेट 24 : कॉलेजमध्ये जाणाऱ्या एका सतरा वर्षीय तरुणीला रस्त्यात गाठून एका युवकाने तिची छेड काढली.मुलीच्या तक्रारीवरून वाळूज MIDC पोलिसांनी संशयित आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला.

तक्रारदार मुलगी वडगाव कोल्हाटीमध्ये राहते. ती बारावीमध्ये शिकत असून, त्यांच्याच कॉलनीमध्ये राहणाऱ्या गौरव सोबत तिची ओळख होती, गौरव माळोदे हा पत्नी व मुलांसह राहत होता. २३ जून रोजी सायंकाळी, मुलगी काही कामानिमित्त स्कुटीवरून दक्षिण हनुमान मंदिराकडून अण्णाभाऊ साठे चौकाकडे जात असताना, गौरवने तिचा पाठलाग केला आणि तिला मला तुझ्यासोबत बोलायचे आहे. असे म्हणाला.

पण त्या तरुणीने गौरवकडे दुर्लक्ष केले आणि ती घराच्या दिशेने गाडी चालवत राहिली. गौरव सुद्धा तिच्या मागे मागे घरापर्यंत पोहोचला. ही गोष्ट मुलीने आईला सांगताच त्या दोघींनी त्याचा शोध घेतला, पण तो दिसून आला नाही. नंतरच्या काळात कॉलेजच्या admission चे काम सुरू असल्याने मुलीने पोलिसांना तक्रार दिली नव्हती. पण आता तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Related Posts

तिरोडा 400 केव्ही वीजवाहिनीसाठी व्याघ्र भ्रमणमार्गात 5,152 वृक्षतोडीला राज्य वन्यजीव मंडळाची मंजुरी; शेतकरी व वन्यजीवप्रेमींचा विरोध

गोंदिया / मराठवाडा अपडेट 24 : कर्जतमधील वीजप्रकल्पासाठी होणाऱ्या वृक्षतोडीविरोधात राज्यभरातून विरोध सुरू असतानाच राज्य वन्यजीव मंडळाने आणखी…

ByByrushikesh Nov 2, 2026

भारताने आशियाई क्रिकेट सुवर्णपदकाचे केले यशस्वी रक्षण; पाकिस्तानचा १९ धावांनी पराभव

आशियाई क्रिकेट स्पर्धा २०२६ च्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा १९ धावांनी पराभव करत सलग दुसरे सुवर्णपदक पटकावले. जपानमधील…

ByByrushikesh Oct 3, 2026

केतन अग्रवाल हत्याकांड: तिसरा आरोपी रितेश हिंगे अटक, बीड कनेक्शनचा धागा

केतन अग्रवाल हत्याकांडात मोठा खुलासा! चेतन चौधरीचा वर्गमित्र रितेश हिंगे तिसरा आरोपी, लोहगड किल्ल्यावरील कटाची माहिती. बीडचा रहिवासी,…

ByByrushikesh Sep 6, 2026

राष्ट्रीय कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची नळदुर्ग किल्ल्यावर तीन मुलांसह दुर्दैवी उडी

धाराशिवच्या नळदुर्ग किल्ल्यावर राष्ट्रीय कुस्तीपटू अश्विनी पौळ यांनी आपल्या तीन मुलांसह उडी घेतली. ५ सुवर्ण, ६ रौप्य पदकांची…

ByByrushikesh Sep 4, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top