• Home
  • Breaking News
  • पुण्यात भोंदू गुरूचा धक्कादायक प्रकार; अर्धनग्न फोटोची मागणी, अटक
Image

पुण्यात भोंदू गुरूचा धक्कादायक प्रकार; अर्धनग्न फोटोची मागणी, अटक

पुण्यातील कोंढवा पोलिसांनी शरीरातील नकारात्मक ऊर्जा काढण्याच्या बहाण्याने तरुणीकडे अर्धनग्न फोटो मागणाऱ्या २३ वर्षीय भोंदू गुरूला अटक केली आहे. वाचा सविस्तर…

marathwada update 24 : सोशल मीडियावर स्वतःला मोटिव्हेशनल स्पीकर आणि आध्यात्मिक गुरू म्हणवणाऱ्या एका तरुणाने तरुणीला भीती दाखवून तिचे अर्धनग्न फोटो मागवल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातून उघडकीस आला आहे. कोंढवा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

दिव्य जितेंद्र परमार (वय २३, रा. पार्श्वनगर सोसायटी, कोंढवा बुद्रुक) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी एका २२ वर्षीय तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आरोपी दिव्य परमार हा महाविद्यालयात व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत असतानाच त्याने स्वतःला ‘मोटिव्हेशनल स्पीकर’ म्हणून प्रस्थापित करण्यास सुरुवात केली. वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षीच त्याने ठिकठिकाणी भाषणे देण्यास प्रारंभ केला.

सोशल मीडियावर केली स्वतःची ब्रँडिंग

कालांतराने त्याने सोशल मीडियावर स्वतःचे यूट्यूब चॅनेल सुरू करून मोठा चाहता वर्ग (Followers) तयार केला. या चाहत्यांकडून शुल्क आकारून तो व्याख्याने देऊ लागला. पुढे त्याने स्वतःला ‘आध्यात्मिक गुरू’ म्हणवण्यास सुरुवात केली आणि काही भक्त त्याला दैवी व्यक्तिमत्त्व मानू लागले.

‘नकारात्मक ऊर्जा’चे आमिष दाखवून फसवणूक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने सोशल मीडियाच्या माध्यमातून फिर्यादी तरुणीशी संपर्क साधला. स्वतःला आध्यात्मिक गुरू सांगत त्याने तरुणीशी संवाद वाढवला. “शारीरिक हालचालींच्या माध्यमातून शरीरातील नकारात्मक ऊर्जा (Negative Energy) काढून टाकता येते,” असे आमिष त्याने तरुणीला दाखवले.

त्याने तिला व्यायामासंबंधीच्या टिप्स देण्यास सुरुवात केली आणि नंतर “तुमची व्यायामातील प्रगती पाहायची असेल तर अर्धनग्न फोटो पाठवा,” अशी मागणी केली. तरुणीने नकार दिल्यास त्याने तिला भीती दाखवली आणि तिचे अर्धनग्न फोटो मोबाईलवरून मागवून घेतले.

पोलीस कारवाई आणि न्यायालयीन कोठडी

घाबरलेल्या तरुणीने धाडस करत कोंढवा पोलीस ठाण्यात धाव घेत आपबिती सांगितली. तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत दिव्य परमारला अटक केली.

तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीचा मोबाईल फोन आणि लॅपटॉप जप्त केला असून, त्यातील फोटो, मेसेज, व्हिडिओ तसेच इतर डिजिटल पुराव्यांची तपासणी सुरू आहे. आरोपीने अशा प्रकारे आणखी किती महिला किंवा तरुणींना जाळ्यात ओढले आहे, याचाही तपास पोलीस करत आहेत.

कायदेशीर कारवाई

या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ७५, ७८, ७९ व ३१८(४) (विनयभंग व फसवणूक), जादूटोणा प्रतिबंधक कायदा २०१३ मधील कलम ३(२) आणि माहिती तंत्रज्ञान (IT) कायद्यातील कलम ६७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केल्यानंतर न्यायालयाने आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

या घटनेने पुण्यात सुरू असलेल्या देवदेवतांच्या नावाखालील भोंदूगिरीच्या प्रकारांवर पुन्हा एकदा संताप व्यक्त केला जात आहे.

Related Posts

LPG e-KYC: एजन्सी पैसे मागतेय? एक पैसाही देऊ नका; 30 सप्टेंबरपर्यंत हे काम कराच

आधार आधारित बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन (BAA) 30 सप्टेंबर 2026 पर्यंत पूर्ण करणे अनिवार्य; 1 ऑक्टोबरपासून सबसिडीयुक्त सिलिंडरसाठी आधार ऑथेंटिकेशन…

ByByrushikesh Sep 24, 2026

मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय! लाऊडस्पीकर वाजवायचा असेल तर मंडळांना जमा करावे लागणार 1 लाख रुपये

मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! लाऊडस्पीकर वापरण्यासाठी मंडळांना 1 लाख रुपयांची अनामत रक्कम भरावी लागणार मुंबई: गणेशोत्सवासह सर्व…

ByByrushikesh Sep 24, 2026

रविवारीही बँका सुरू, ३ दिवसांच्या देशव्यापी बँक संपापूर्वी सरकारचा मास्टरस्ट्रोक.

बँक कर्मचारी संघटनांनी २८ ते ३० सप्टेंबर २०२६ दरम्यान तीन दिवसांच्या देशव्यापी संपाची हाक दिल्यानंतर, ग्राहकांना दिलासा देण्यासाठी…

ByByrushikesh Sep 24, 2026

‘नो युपीआय डे’: 2 ऑक्टोबरला क्यूआर कोड काळ्या कापडाने झाकणार; महाराष्ट्रासह देशभरातील 500 हून अधिक व्यापारी संघटना आंदोलनात

एमडीआर शुल्काच्या विरोधात देशभरातील व्यापारी संघटनांचे आंदोलन; गांधी जयंतीला क्यूआर कोड काळ्या कापडाने झाकून ‘गांधीगिरी’चा मार्ग मुंबई: युपीआय…

ByByrushikesh Sep 24, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top