• Home
  • Crime
  • प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यूचे गूढ वाढले; आत्महत्या की हत्या? पोलिसांचा तपास सुरू, सीबीआय चौकशीची मागणी
Image

प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यूचे गूढ वाढले; आत्महत्या की हत्या? पोलिसांचा तपास सुरू, सीबीआय चौकशीची मागणी

वृंदावनातील गुरु कृपा कुंज आश्रमात प्रेमानंद महाराजांचे शिष्य रसिक दुलारी शरण यांचा चौथ्या मजल्यावरून पडून मृत्यू. पोलिसांनी आत्महत्या असल्याचे म्हटले असले तरी शरीरावरील जखमा, खोलीतील रक्ताने माखलेला ग्राइंडर आणि कुटुंबाच्या गंभीर आरोपांमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

वृंदावन: प्रसिद्ध कथावाचक संत प्रेमानंद महाराज यांच्या आश्रमात एक धक्कादायक घटना घडली आहे. महाराजांचे 25 वर्षीय शिष्य रसिक दुलारी शरण (मूळ नाव दीपक लोधी) यांचा चौथ्या मजल्यावरून पडून संशयास्पद मृत्यू झाला आहे. ही घटना गुरुवारी (25 सप्टेंबर) संध्याकाळी उत्तर प्रदेशातील वृंदावन येथील वराह घाट परिसरातील ‘गुरु कृपा कुंज’ आश्रमात घडली. मध्य प्रदेशातील जबलपूरचे रहिवासी असलेले दीपक लोधी हे 2015 पासून संन्यासी जीवन स्वीकारून ‘रसिक दुलारी शरण’ या नावाने ओळखले जात होते.

पोलिसांनी सुरुवातीला हा आत्महत्येचा प्रकार असल्याचे म्हटले आहे, परंतु मृतदेहावरील गंभीर जखमा, खासगी अवयवावरील काप आणि घटनास्थळावर आढळलेला रक्ताने माखलेला ग्राइंडर यामुळे या प्रकरणाचे गूढ आणखी वाढले आहे. यामुळेच पोलिस आता आत्महत्या आणि हत्या अशा दोन्ही अँगलने तपास करत आहेत.

नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी संध्याकाळी रसिक दुलारी शरण हे गुरु कृपा कुंज इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील छतावर गेले होते. तिथे काही वेळ बसल्यानंतर त्यांनी अचानक खाली उडी मारली. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने सर्वोदय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

मृतदेहाची पंचनामा करण्यात आली असून पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच वृंदावन पोलीस आणि फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी धाव घेतली आणि पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली.

शरीरावरील जखमा आणि खोलीतील ग्राइंडरने वाढवलेले गूढ

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रसिक यांच्या शरीरावर डोके आणि इतर अवयवांवर गंभीर जखमा आढळल्या आहेत. विशेष म्हणजे, त्यांच्या खासगी अवयवावरही कापल्याचे गंभीर जखमांचे निशान आढळले आहेत. याशिवाय, त्यांच्या खोलीत रक्ताने माखलेला एक ग्राइंडर सापडला आहे. या ग्राइंडरमुळे तपासाची दिशा बदलली असून पोलिस या जखमा उडी मारल्यामुळे झाल्या की त्यापूर्वीच कोणी त्या पोहोचवल्या, याचा तपास करत आहेत.

कुटुंबाचे गंभीर आरोप

या घटनेनंतर मृताच्या कुटुंबीयांनी आश्रम प्रबंधनावर गंभीर आरोप केले आहेत. रसिक यांचे मेहुणे सोनू पटेल यांनी सांगितले की, कुटुंबीयांना फोन करून केवळ एवढेच सांगण्यात आले होते की, दीपक घसरून पडला असून त्याच्यावर रुग्णालयात ऑपरेशन सुरू आहे. कुटुंबीय जेव्हा धावत-पळत आश्रमात पोहोचले, तेव्हा त्यांना मृतदेह पाहण्याची परवानगीही देण्यात आली नाही.

शिवाय, कुटुंबीयांचा आरोप आहे की, गेल्या दोन वर्षांपासून त्यांना रसिक यांना भेटण्याची परवानगी दिली जात नव्हती आणि फोनवरही बोलणे बंद करण्यात आले होते. आश्रम प्रबंधनाने कुटुंबीयांना जाणीवपूर्वक दूर ठेवल्याचा त्यांचा दावा आहे.

संतांची सीबीआय चौकशीची मागणी

या घटनेमुळे वृंदावनातील साधू-संतांमध्येही संतापाची लाट उसळली आहे. अनेक संतांनी या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. श्रीकृष्ण जन्मभूमि मंदिर-मस्जिद प्रकरणातील याचिकाकर्ते दिनेश फलाहारी महाराज यांनी या घटनेची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. तर महामंडलेश्वर राधानंद गिरी यांनीही संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, असे मत व्यक्त केले आहे.

सध्या पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला असून फॉरेन्सिक अहवालाची वाट पाहत आहेत. फॉरेन्सिक अहवाल आणि पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. पोलिस सध्या सीसीटीव्ही फुटेज तपासत असून मृताचा मोबाइल फोनही ताब्यात घेतला आहे. मथुरा पोलिसांनी सांगितले की, प्राथमिक तपासात आत्महत्या असल्याचे दिसत असले तरी कोणतीही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तपास सुरू आहे.

Related Posts

मराठवाड्याचा दुष्काळ संपवणार! जपानकडून वॉटर ग्रीडला २० हजार कोटींचा निधी, सहा धरणे जोडणार

मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी जायका (JICA) कडून २० हजार कोटी रुपयांच्या कर्जाला सकारात्मक प्रतिसाद; छत्रपती संभाजीनगर,…

ByByrushikesh Nov 7, 2026

नंदुरबार सामूहिक बलात्कार प्रकरण: पुराव्यांच्या त्रुटींमुळे मुंबई उच्च न्यायालयाकडून सर्व आरोपी निर्दोष मुक्त

पीडितेच्या साक्षीतील विसंगती, वैद्यकीय अहवालातील त्रुटी आणि डीएनए पुराव्याची अखंडता सिद्ध न झाल्याने न्यायालयाने खालच्या न्यायालयाचा निर्णय रद्द…

ByByrushikesh Nov 7, 2026

३० लाख द्या अन् दोन मुलांना नोकरी लावा, नाहीतर जेसीबी जाळू”; पोलिसांसमोरच धमकी, कंपनीच्या सुरक्षारक्षकासह आई-वडिलांवर गुन्हा

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात अवादा एनर्जीच्या पवनचक्की प्रकल्पाचे काम अडवून ३० लाख रुपयांची खंडणी आणि दोन मुलांना नोकरीची…

ByByrushikesh Nov 6, 2026

व्हिडिओकॉनचं २० हजार कोटींचं साम्राज्य कोसळलं; वेणुगोपाल धूत अधिकृतपणे दिवाळखोर घोषित

छ. संभाजीनगर : एकेकाळी भारतीय मध्यमवर्गीय कुटुंबांच्या स्वप्नांचा भाग असलेला आणि ‘प्रत्येक घराची पसंती’ म्हणून ओळखला जाणारा व्हिडिओकॉन…

ByByrushikesh Nov 6, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top