• Home
  • Agriculture
  • मराठवाडा कृषी विद्यापीठात उद्या रब्बी मेळावा; ज्वारी, हरभरा, गव्हासह १० पिकांची बियाणे विक्री, दर जाहीर
Image

मराठवाडा कृषी विद्यापीठात उद्या रब्बी मेळावा; ज्वारी, हरभरा, गव्हासह १० पिकांची बियाणे विक्री, दर जाहीर

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे १७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता रब्बी पीक परिसंवाद व कृषि प्रदर्शन; शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, पीक व्यवस्थापन आणि विद्यापीठ विकसित बियाण्यांची माहिती मिळणार

परभणी: मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीच्या विस्तार शिक्षण संचालनालय आणि कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रब्बी पीक परिसंवाद व कृषि प्रदर्शन’ आयोजित करण्यात आले आहे. हा कार्यक्रम गुरुवार, दि. १७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता विद्यापीठातील कृषि महाविद्यालयाच्या सभागृहात होणार आहे.

या परिसंवादात शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील विविध पिकांचे नियोजन, आधुनिक कृषि तंत्रज्ञान, पीक उत्पादनवाढीच्या उपाययोजना तसेच विद्यापीठाने विकसित केलेल्या कृषि तंत्रज्ञानाची माहिती मिळणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ निर्मित बियाणे विक्रीने होणार असून, यंदा ज्वारी, हरभरा, जवस, करडई, गहू, तीळ, सूर्यफूल, बाजरा, भेंडी आणि मिरची या पिकांची बियाणे विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

विद्यापीठ निर्मित बियाण्यांचे दर जाहीर

विक्रीसाठी उपलब्ध बियाणे व त्याचे दर सहयोगी संचालक (बियाणे) डॉ. हिराकांत काळपांडे आणि बीज प्रक्रिया केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. संतोष शिंदे यांनी जाहीर केले आहेत. त्यानुसार:

ज्वारी

ज्वारीचा परभणी शक्ती, सुपर मोती, परभणी मोती आणि परभणी ज्योती हे वाण विक्रीस उपलब्ध आहेत. प्रत्येक वाणाची बॅग ४ किलोची असून प्रति बॅगचा दर ५०० रुपये आहे. तसेच हुरड्यासाठी परभणी वसंत हा वाण १ किलोच्या बॅगमध्ये उपलब्ध असून प्रति बॅग १५० रुपये दर आहे.

हरभरा

हरभरा वाण बीडीएनजीके ७९८ (काबुली), बीडीएनजी ७९७ (आकाश), फुले विक्रम आणि परभणी चना उपलब्ध आहेत. दहा किलोची बॅग पॅकिंग असून बीडीएनजीके ७९८ या वाणाचा दर १२५० रुपये तर हरभराच्या इतर वाणांचा दर ९०० रुपये प्रति बॅग आहे.

जवस

जवसाचा एलएसएल ९३ हा वाण उपलब्ध असून ५ किलोची बॅग ६५० रुपये तर २ किलोची बॅग २६० रुपये दराने उपलब्ध आहे.

करडई

करडईचे पीबीएनएस १५४ (परभणी सुवर्णा), पीबीएनएस १८४, पीबीएनएस ८६ (परभणी पूर्णा) आणि पीबीएनएस १२ (परभणी कुसुम) हे वाण ५ किलोच्या बॅगमध्ये उपलब्ध असून बॅगचा दर ६५० रुपये आहे.

गहू

गव्हाचे एनआयएडब्ल्यू १९९४ (फुले समाधान) आणि एनआयएडब्ल्यू ३०१ (फुले त्र्यंबक) हे वाण उपलब्ध आहेत. बॅग पॅकिंग ४० किलोची असून दर २००० रुपये प्रति बॅग आहे.

तीळ आणि सूर्यफूल

तीळाची टीएलटी-१० जात १ किलोची बॅग २५० रुपये दराने तर सूर्यफूलाची एल.एस.एफ.एच-१७१ या वाणाची २ किलोची बॅग १००० रुपये दराने उपलब्ध आहे.

इतर पिके

बाजराचा ए.एच.बी-१२०० हा वाण १.५ किलोच्या बॅगमध्ये २८५ रुपये प्रति बॅग दराने उपलब्ध आहे. भेंडीची परभणी क्रांती जात २० ग्रॅमचा दर ३० रुपये तर मिरचीचे परभणी तेजस आणि पीबीएनसी-१७ यासाठी १० ग्रॅमचा दर ४० रुपये आहे.

तांत्रिक सत्रात तज्ज्ञांचे मार्गदर्शन

पीक परिसंवादाच्या तांत्रिक सत्रात हवामान अंदाज, पर्जन्यमानाची सद्यपरिस्थिती व पिकांचे व्यवस्थापन, सुधारित हरभरा, रब्बी तेलबिया, रब्बी ज्वार, गहू, रब्बी भाजीपाला या पिकांचे लागवड तंत्रज्ञान, शेतीला जोडधंदा म्हणून पशुधनाचे महत्त्व, तसेच सद्यस्थितीतील कापूस, तूर व हळद पिकांचे संरक्षण व व्यवस्थापन या विषयांवर विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे.

शेतकऱ्यांना आवाहन

परभणी व परिसरातील शेतकरी, कृषि विभागाचे अधिकारी, कृषि विद्यापीठातील शास्त्रज्ञ, विद्यार्थी आणि संबंधितांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक संचालक विस्तार शिक्षण डॉ. राकेश आहिरे, परभणीचे आत्मा विभागाचे संचालक श्री. दौलत चव्हाण आणि जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री. भास्कर कोळेकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Posts

LPG e-KYC: एजन्सी पैसे मागतेय? एक पैसाही देऊ नका; 30 सप्टेंबरपर्यंत हे काम कराच

आधार आधारित बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन (BAA) 30 सप्टेंबर 2026 पर्यंत पूर्ण करणे अनिवार्य; 1 ऑक्टोबरपासून सबसिडीयुक्त सिलिंडरसाठी आधार ऑथेंटिकेशन…

ByByrushikesh Sep 24, 2026

मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय! लाऊडस्पीकर वाजवायचा असेल तर मंडळांना जमा करावे लागणार 1 लाख रुपये

मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! लाऊडस्पीकर वापरण्यासाठी मंडळांना 1 लाख रुपयांची अनामत रक्कम भरावी लागणार मुंबई: गणेशोत्सवासह सर्व…

ByByrushikesh Sep 24, 2026

रविवारीही बँका सुरू, ३ दिवसांच्या देशव्यापी बँक संपापूर्वी सरकारचा मास्टरस्ट्रोक.

बँक कर्मचारी संघटनांनी २८ ते ३० सप्टेंबर २०२६ दरम्यान तीन दिवसांच्या देशव्यापी संपाची हाक दिल्यानंतर, ग्राहकांना दिलासा देण्यासाठी…

ByByrushikesh Sep 24, 2026

‘नो युपीआय डे’: 2 ऑक्टोबरला क्यूआर कोड काळ्या कापडाने झाकणार; महाराष्ट्रासह देशभरातील 500 हून अधिक व्यापारी संघटना आंदोलनात

एमडीआर शुल्काच्या विरोधात देशभरातील व्यापारी संघटनांचे आंदोलन; गांधी जयंतीला क्यूआर कोड काळ्या कापडाने झाकून ‘गांधीगिरी’चा मार्ग मुंबई: युपीआय…

ByByrushikesh Sep 24, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top