• Home
  • Beed
  • केज हत्याप्रकरणाचे विधिमंडळात पडसाद,
Image

केज हत्याप्रकरणाचे विधिमंडळात पडसाद,

आमदार धनंजय मुंडे यांनी केली मोठी मागणी

बीड : जिल्ह्यातील केज तालुक्यात २० जून रोजी घडलेल्या हत्याप्रकरणाचे पडसाद आज विधिमंडळात उमटले. परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी विधानसभेत या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. तरुण विलास घुले याच्या निर्घृण हत्येप्रकरणी पोलिसांकडून मुख्य सूत्रधाराचा बचाव केला जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

विधानसभेत पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, “केज तालुक्यात २० जूनच्या रात्री एका व्यक्तीवर हल्ला करण्यात आला. मात्र, हा वाद मिटवण्यासाठी गेलेल्या विलास घुले या निष्पाप तरुणावर प्राणघातक हल्ला करून त्याची हत्या करण्यात आली. हे संपूर्ण प्रकरण पूर्वनियोजित कट आहे.”

मुख्य सूत्रधाराचा शोध घ्यावा – धनंजय मुंडे

आमदार मुंडे यांनी या प्रकरणातील खरा सूत्रधार कोण, याचा शोध घेण्याची मागणी केली. ते म्हणाले, “पोलिस प्रशासनाने या प्रकरणात आरोपींची सर्व पाळे-मुळे खोदून काढत खरा सूत्रधार कोण आहे, याचा तपास करावा. मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचून सर्व आरोपींना अटक करण्यात यावी.”

धनंजय मुंडे यांनी पुढे आरोप केला की, “या हत्याप्रकरणातील मास्टरमाईंडचा पोलिसांकडून बचाव केला जात आहे. योग्य ती कारवाई होत नसल्याने केजमध्ये हजारो नागरिक रस्त्यावर उतरले आहेत.”

धनंजय मुंडे यांच्या मागणीची तात्काळ दखल घेत विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी गृह विभागाला योग्य कार्यवाहीचे निर्देश दिले. या घटनेच्या गांभीर्याने दखल घेत त्यांनी त्वरित चौकशीचे आदेश दिल्याची माहिती आहे.

पंकजा मुंडे यांची भूमिका; मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार

मंत्री पंकजा मुंडे यांनी या घटनेची दखल घेतली आहे. त्यांनी पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्याशी फोनवर सविस्तर चर्चा करून माहिती घेतली.

पंकजा मुंडे म्हणाल्या, “विलास घुले या तरुणाच्या मृत्यूची घटना अतिशय दुर्दैवी आहे. भांडण सोडवायला गेलेल्या तरुणाला मारणं, इतकं की त्याचा मृत्यू व्हावा, हे अत्यंत दुःखद आहे. घटनेत विलासला काहीही संबंध नसताना हकनाक मृत्यू स्वीकारावा लागला. हे सर्व अस्वस्थ करणारं आहे.”

पोलीस अधीक्षकांना कडक सूचना

पंकजा मुंडे यांनी पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांना कोणत्याही दडपणाला बळी न पडता दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या म्हणाल्या, “एसपी कावत यांनी योग्य तपास करावा. मृत तरुणाच्या परिवाराने विश्वास दाखवून सहकार्य करावे. त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल.”

पंकजा मुंडे यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही चर्चा करणार असल्याचे स्पष्ट केले. “योग्य न्यायासाठी आम्ही पीडित कुटुंबियांच्या पाठीशी आहोत,” असे त्यांनी सांगितले.


केजमध्ये चौथा दिवस; हजारो नागरिकांचा रस्त्यावर आक्रोश

दरम्यान, केज तालुक्यात या घटनेला चौथा दिवस उलटला असतानाही परिस्थिती तणावपूर्ण आहे. विलास घुले या निष्पाप तरुणाला विनाकारण प्राण गमवावे लागल्याचा तीव्र निषेध करत कुटुंबीय व हजारो नागरिक रस्त्यावर उतरले आहेत.

मृतदेह ताब्यात घेण्यास आणि अंत्यसंस्कार करण्यास घुले कुटुंबियांनी नकार दिला आहे. केजमध्ये कडकडीत बंद पुकारण्यात आला आहे. पोलीस ठाणे व अन्य ठिकाणी रस्ता रोको आंदोलन सुरू आहे.

Related Posts

मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय! लाऊडस्पीकर वाजवायचा असेल तर मंडळांना जमा करावे लागणार 1 लाख रुपये

मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! लाऊडस्पीकर वापरण्यासाठी मंडळांना 1 लाख रुपयांची अनामत रक्कम भरावी लागणार मुंबई: गणेशोत्सवासह सर्व…

ByByrushikesh Sep 24, 2026

रविवारीही बँका सुरू, ३ दिवसांच्या देशव्यापी बँक संपापूर्वी सरकारचा मास्टरस्ट्रोक.

बँक कर्मचारी संघटनांनी २८ ते ३० सप्टेंबर २०२६ दरम्यान तीन दिवसांच्या देशव्यापी संपाची हाक दिल्यानंतर, ग्राहकांना दिलासा देण्यासाठी…

ByByrushikesh Sep 24, 2026

‘नो युपीआय डे’: 2 ऑक्टोबरला क्यूआर कोड काळ्या कापडाने झाकणार; महाराष्ट्रासह देशभरातील 500 हून अधिक व्यापारी संघटना आंदोलनात

एमडीआर शुल्काच्या विरोधात देशभरातील व्यापारी संघटनांचे आंदोलन; गांधी जयंतीला क्यूआर कोड काळ्या कापडाने झाकून ‘गांधीगिरी’चा मार्ग मुंबई: युपीआय…

ByByrushikesh Sep 24, 2026

धाराशिवमध्ये पवन ऊर्जा प्रकल्पांना चोरीचा मोठा फटका; ८ महिन्यांत २० कोटींचे साहित्य चोरीस, प्रकल्प वर्षभर लांबणीवर

धाराशिवमधील पवन ऊर्जा प्रकल्पांमध्ये ८ महिन्यांत २० कोटींचे साहित्य चोरीस गेल्याने प्रकल्प एक वर्ष लांबले. चोरी आणि तोडफोडीमुळे…

ByByrushikesh Sep 24, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top