• Home
  • Breaking News
  • छ. संभाजीनगरात ‘येस फाईन बेकरी’वर FDA ची कारवाई; दरवाजाविरहित शौचालय, माशांचा वावर, परवाना निलंबित
Image

छ. संभाजीनगरात ‘येस फाईन बेकरी’वर FDA ची कारवाई; दरवाजाविरहित शौचालय, माशांचा वावर, परवाना निलंबित

छत्रपती संभाजीनगरातील येस फाईन बेकरीवर FDA ने धडक कारवाई केली. अन्न उत्पादन क्षेत्रात दरवाजा नसलेले शौचालय, माशांचा वावर, कर्मचाऱ्यांकडून तंबाखू सेवन आणि ग्राहकांची फसवणूक उघड. बेकरीचा परवाना तत्काळ निलंबित.

छ. संभाजीनगरातील ‘येस फाईन बेकरी’वर एफडीएची मोठी कारवाई; अन्नसुरक्षा नियमांचे घोर उल्लंघन

छत्रपती संभाजीनगर, (marathwada upadate 24 ) – शहरातील जुना बायजीपुरा येथील ‘येस फाईन बेकरी’वर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी धडक कारवाई केली आहे. तपासणीदरम्यान बेकरीत अन्न उत्पादनाच्या ठिकाणी दरवाजा नसलेले अत्यंत घाणेरडे शौचालय, माशांचा वावर, कर्मचाऱ्यांकडून तंबाखूचे सेवन तसेच ग्राहकांची दिशाभूल करणारी लेबलिंग आढळून आल्याने प्रशासनाने बेकरीचा अन्नसुरक्षा परवाना तात्काळ निलंबित केला आहे.

ही कारवाई राज्याचे अन्नसुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या ‘सेफ फूड – सेफ महाराष्ट्र’ मोहिमेंतर्गत करण्यात आली. FDA च्या पथकाने बुधवार अचानक छापा टाकला असता बेकरीतील किळसवाणे वातावरण पाहून अधिकारीही स्तब्ध झाले.

अन्न उत्पादनाच्या ठिकाणीच दरवाजाविरहित शौचालय

एफडीए अधिकाऱ्यांनी बेकरीत प्रवेश केला असता सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, अन्नपदार्थ उत्पादनाच्या मुख्य जागेतच दरवाजा नसलेले अत्यंत घाणेरडे शौचालय आढळून आले. टोस्ट तयार करण्याच्या ठिकाणापासून अवघ्या काही अंतरावर हे शौचालय होते. कामगारांना हात धुण्यासाठी वॉश बेसिन किंवा साबणाची कोणतीही सोय नव्हती. यामुळे अन्नामध्ये जंतूसंसर्ग होण्याचा मोठा धोका निर्माण झाला होता.

माशा, कीटक आणि धुळीचा डोंब; अस्वच्छतेचे साम्राज्य

बेकरीच्या खिडक्यांना जाळ्या नसल्याने माशा, कीटक आणि धूळ थेट अन्नपदार्थांमध्ये मिसळत होती. टोस्ट बनवल्यानंतर उरलेले कचरा आणि निकृष्ट साहित्य त्याच परिसरात उघड्यावर फेकून दिलेले होते. संपूर्ण उत्पादन क्षेत्र गंज, धूळ आणि जळमटांनी माखलेले होते. बेकरी पदार्थांसाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याच्या टाक्या आतून-बाहेरून अत्यंत अस्वच्छ होत्या आणि त्यांच्या स्वच्छतेबाबत कोणतीही नोंद ठेवलेली नव्हती.

कर्मचाऱ्यांकडून तंबाखू सेवन

आणखी एक गंभीर बाब उघडकीस आली ती म्हणजे, बेकरी पदार्थ बनवणाऱ्या कामगारांना अन्न बनवताना थेट तंबाखू खाताना पथकाने रंगेहात पकडले. अन्न उत्पादन क्षेत्रात तंबाखूसारख्या व्यसनाधीन पदार्थांचे सेवन हा अन्नसुरक्षा नियमांचा गंभीर भंग आहे.

फसव्या लेबलिंगद्वारे ग्राहकांची दिशाभूल

तपासणीदरम्यान आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला. बेकरीत ‘बिग बाइट २०-२० रोस्टेड ब्रेड’चे उत्पादन व पॅकिंग सुरू होते. ही ब्रेड येस फाईन बेकरीमध्ये बनवली जात असताना, पॅकेटवर उत्पादक म्हणून दुसऱ्या कंपनीचे – ‘गार्डन बेकर्स’ – नाव व पत्ता छापण्यात आला होता. अधिकाऱ्यांनी ही ग्राहकांची जाणीवपूर्वक दिशाभूल करणारी आणि अन्नसुरक्षा कायद्याचे उल्लंघन करणारी कृती मानली.

परवाना निलंबित; व्यावसायिकांमध्ये खळबळ

अन्नसुरक्षा नियमांचे सर्रास उल्लंघन, अत्यंत अस्वच्छ वातावरण, कर्मचाऱ्यांची बेजबाबदार वृत्ती आणि ग्राहकांची फसवणूक या सर्व गंभीर बाबी लक्षात घेऊन एफडीएने येस फाईन बेकरीचा अन्नसुरक्षा परवाना तात्काळ प्रभावाने निलंबित केला आणि दुकान बंद करण्याचे आदेश दिले.

ही कारवाई शहरातील इतर व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वीच शहरातील प्रसिद्ध उत्तम मिठाई आणि उपहारगृहावरही एफडीएने कारवाई केली होती. आता येस फाईन बेकरीप्रकरणी झालेली कडक कारवाई उर्वरित व्यावसायिकांसाठी कठोर इशारा ठरली आहे.


नागरिकांच्या आरोग्याशी खेळ नाही – एफडीए

अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आणि अत्यंत अस्वच्छ वातावरणात खाद्यपदार्थांची निर्मिती करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली जाईल. ‘सेफ फूड – सेफ महाराष्ट्र’ मोहिमेंतर्गत राज्यभरात अशा प्रकारच्या कारवायांना वेग देण्यात आला आहे. नागरिकांनीही आपल्या परिसरातील खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत सतर्क राहावे आणि कोणतीही अनियमितता आढळल्यास संबंधित विभागाकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Related Posts

मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय! लाऊडस्पीकर वाजवायचा असेल तर मंडळांना जमा करावे लागणार 1 लाख रुपये

मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! लाऊडस्पीकर वापरण्यासाठी मंडळांना 1 लाख रुपयांची अनामत रक्कम भरावी लागणार मुंबई: गणेशोत्सवासह सर्व…

ByByrushikesh Sep 24, 2026

रविवारीही बँका सुरू, ३ दिवसांच्या देशव्यापी बँक संपापूर्वी सरकारचा मास्टरस्ट्रोक.

बँक कर्मचारी संघटनांनी २८ ते ३० सप्टेंबर २०२६ दरम्यान तीन दिवसांच्या देशव्यापी संपाची हाक दिल्यानंतर, ग्राहकांना दिलासा देण्यासाठी…

ByByrushikesh Sep 24, 2026

‘नो युपीआय डे’: 2 ऑक्टोबरला क्यूआर कोड काळ्या कापडाने झाकणार; महाराष्ट्रासह देशभरातील 500 हून अधिक व्यापारी संघटना आंदोलनात

एमडीआर शुल्काच्या विरोधात देशभरातील व्यापारी संघटनांचे आंदोलन; गांधी जयंतीला क्यूआर कोड काळ्या कापडाने झाकून ‘गांधीगिरी’चा मार्ग मुंबई: युपीआय…

ByByrushikesh Sep 24, 2026

धाराशिवमध्ये पवन ऊर्जा प्रकल्पांना चोरीचा मोठा फटका; ८ महिन्यांत २० कोटींचे साहित्य चोरीस, प्रकल्प वर्षभर लांबणीवर

धाराशिवमधील पवन ऊर्जा प्रकल्पांमध्ये ८ महिन्यांत २० कोटींचे साहित्य चोरीस गेल्याने प्रकल्प एक वर्ष लांबले. चोरी आणि तोडफोडीमुळे…

ByByrushikesh Sep 24, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top