• Home
  • Breaking News
  • एफडीएची मोठी कारवाई: ‘यल्ला यल्ला’ आणि ‘आईच्या गावात’ रेस्टॉरंटचे परवाने निलंबित
Image

एफडीएची मोठी कारवाई: ‘यल्ला यल्ला’ आणि ‘आईच्या गावात’ रेस्टॉरंटचे परवाने निलंबित

 एफडीएने दोन प्रसिद्ध रेस्टॉरंटवर केलेल्या छाप्यात किचनमधील किळसवाणा प्रकार उघडकीस आला. सिंथेटिक फूड कलर, बुरशी लागलेले आंबे आणि सडलेल्या भाज्यांसह अन्य गंभीर बाबी समोर आल्या.

प्रसिद्ध हॉटेल्सवर FDA ची कठोर कारवाई

हॉटेलमध्ये जेवायला जाणाऱ्या लाखो ग्राहकांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. FDA ने शहरातील दोन अत्यंत लोकप्रिय रेस्टॉरंटवर अचानक छापे टाकले असता, तेथील किचनमधील भयानक अवस्था पाहून अधिकाऱ्यांनाही धक्का बसला. ‘यल्ला यल्ला’ आणि ‘आईच्या गावात’ या दोन्ही रेस्टॉरंटचे परवाने तात्काळ पुढील आदेशा पर्यंत निलंबित करण्यात आले आहेत.

विद्यानगरच्या ‘यल्ला यल्ला’ हॉटेल मध्ये काय सापडले?

एफडीएच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यानगर येथील ‘यल्ला यल्ला’ रेस्टॉरंटमध्ये बटर चिकन, कबाब आणि चिकन लॉलीपॉप या लोकप्रिय पदार्थांच्या ग्रेव्हीत मोठ्या प्रमाणात सिंथेटिक फूड कलरचा वापर केला जात होता. छाप्यादरम्यान पथकाने २० ते २५ रासायनिक रंगांचे डबे जप्त केले आणि लगेच नष्ट केले. हे रासायनिक रंग आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असून, ते काही दिवस सतत खाण्यात आल्यास गंभीर आजार होऊ शकतात.

‘आईच्या गावात’ रेस्टॉरंटवर ही कारवाई

ईटखेडा-कांचनवाडी येथील ‘आईच्या गावात’ या रेस्टॉरंटमध्ये मेन्यूकार्डवर ‘बटर नान’चे नाव देऊन प्रत्यक्षात स्वस्त दर्जाचे व्हेजिटेबल फॅट स्प्रेड वापरून ग्राहकांची दिशाभूल केली जात होती. याशिवाय, किचनमध्ये रसासाठी बुरशी लागलेले आंबे आणि सडलेल्या पालेभाज्या साठवून ठेवल्याचेही अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले.

हॉटेल व्यावसायिकांमध्ये भीती आणि खवय्या मध्ये खळबळ

या कारवाईमुळे शहरातील इतर प्रसिद्ध हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि ढाब्यांच्या मालकांमध्ये प्रत्येकजन आपल्या हॉटेल बाहेर त्यांच्या हॉटेल मध्ये मिळणाऱ्या पदार्थाबाबत पती लावत आहेत. पण हॉटेल मध्ये खाण्याचे शौकीन असणाऱ्या मध्ये मात्र ‘नाव मोठे पण लक्षण खोटे’ अशी चर्चा सुरु आहे. आरोग्याशी खेळणाऱ्या व्यावसायिकांवर आता कठोर कारवाई केली जाणार असल्याचे संकेत एफडीएने दिले आहेत. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि ढाब्यांवर छापेमारी मोहीम सुरू करण्यात आली आहे.

Related Posts

मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय! लाऊडस्पीकर वाजवायचा असेल तर मंडळांना जमा करावे लागणार 1 लाख रुपये

मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! लाऊडस्पीकर वापरण्यासाठी मंडळांना 1 लाख रुपयांची अनामत रक्कम भरावी लागणार मुंबई: गणेशोत्सवासह सर्व…

ByByrushikesh Sep 24, 2026

रविवारीही बँका सुरू, ३ दिवसांच्या देशव्यापी बँक संपापूर्वी सरकारचा मास्टरस्ट्रोक.

बँक कर्मचारी संघटनांनी २८ ते ३० सप्टेंबर २०२६ दरम्यान तीन दिवसांच्या देशव्यापी संपाची हाक दिल्यानंतर, ग्राहकांना दिलासा देण्यासाठी…

ByByrushikesh Sep 24, 2026

‘नो युपीआय डे’: 2 ऑक्टोबरला क्यूआर कोड काळ्या कापडाने झाकणार; महाराष्ट्रासह देशभरातील 500 हून अधिक व्यापारी संघटना आंदोलनात

एमडीआर शुल्काच्या विरोधात देशभरातील व्यापारी संघटनांचे आंदोलन; गांधी जयंतीला क्यूआर कोड काळ्या कापडाने झाकून ‘गांधीगिरी’चा मार्ग मुंबई: युपीआय…

ByByrushikesh Sep 24, 2026

धाराशिवमध्ये पवन ऊर्जा प्रकल्पांना चोरीचा मोठा फटका; ८ महिन्यांत २० कोटींचे साहित्य चोरीस, प्रकल्प वर्षभर लांबणीवर

धाराशिवमधील पवन ऊर्जा प्रकल्पांमध्ये ८ महिन्यांत २० कोटींचे साहित्य चोरीस गेल्याने प्रकल्प एक वर्ष लांबले. चोरी आणि तोडफोडीमुळे…

ByByrushikesh Sep 24, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top