• Home
  • Breaking News
  • समृद्धी महामार्गावर काळाचा घाला! दुर्गादेवीची मूर्ती घेऊन जाताना भीषण अपघात, ७ ठार, २१ जखमी
Image

समृद्धी महामार्गावर काळाचा घाला! दुर्गादेवीची मूर्ती घेऊन जाताना भीषण अपघात, ७ ठार, २१ जखमी

शेगावहून दुर्गादेवीची मूर्ती घेऊन वर्ध्याकडे जाणाऱ्या बोलेरो पिकअपला धामणगाव रेल्वेजवळ चॅनल ९७ येथे ट्रकने मागून धडक दिल्याने पाच जण जागीच ठार; रुग्णालयात उपचारादरम्यान आणखी दोघांचा मृत्यू

धामणगाव रेल्वे (अमरावती): नवरात्रौत्सवासाठी दुर्गादेवीची मूर्ती घेऊन शेगावहून वर्ध्याकडे परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरो पिकअपला समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. धामणगाव रेल्वेजवळ चॅनल क्रमांक ९७ येथे मागून आलेल्या सोळा चाकी ट्रकने पिकअपला जोरदार धडक दिल्याने पाच जण जागीच ठार झाले, तर २१ जण गंभीर जखमी झाले. रुग्णालयात उपचारादरम्यान आणखी दोघांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ७ वर पोहोचली आहे. ही दुर्दैवी घटना शुक्रवारी (२ ऑक्टोबर) मध्यरात्री १२.४५ ते १ वाजण्याच्या दरम्यान घडली.

नेमकं काय घडलं?

वर्धा येथील सोमनाथ लेआउट, सिंधी मेघे परिसरातील रहिवासी असलेले भाविक नवरात्रौत्सवासाठी शेगाव येथून दुर्गादेवीची मूर्ती घेऊन परतत होते. हे सर्व भाविक बोलेरो पिकअप (क्रमांक एम एच ०५ बी एच ५७९३) मध्ये बसले होते. या पिकअपला मागच्या बाजूला ट्रॉली लावलेली होती. ते वर्ध्याकडे धीम्या गतीने जात असताना, सोळा चाकी ट्रक (क्रमांक सी जी ०७ सी झेड ८८५५) ने मागून जोरदार धडक दिली. धडकेचा आवाज इतका भीषण होता की पिकअपचा चक्काचूर झाला आणि त्यातील अनेक भाविक वाहनातच अडकले.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक रहिवासी आणि पत्रकारांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पोलिसांपेक्षाही आधी बचावकार्य सुरू केले. जखमींना तातडीने धामणगाव ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, पाच जणांनी जागीच प्राण सोडला होता, तर गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी वर्धा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, धामणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान आणखी दोघांचा मृत्यू झाला, त्यामुळे मृतांचा आकडा ७ वर गेला.

मृतकांची यादी

अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये दत्ता कुरसंगे (५५), प्रवीण बकाने (५०), घनश्याम पाटील (६०), गोलू उर्फ सचिन बादलमवार (३८) आणि ओम गावंडे (२२) यांचा समावेश आहे. हे सर्वजण वर्धा येथील सोमनाथ लेआउट, सिंधी मेघे येथील रहिवासी होते. तर उपचारादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या दोघांची नावे अद्याप अधिकृतरीत्या जाहीर झालेली नाहीत.

गंभीर जखमींची यादी

गंभीर जखमींमध्ये दिनेश रामकृष्ण पोहणकर (३५), नरेंद्र प्रल्हाद संयाम (४९), मुनेश्वर देवराव ढोले (५३), सागर मुनेश्वर ढोले (२७), रोशन राऊत (२६), सतीश वसंत राऊत (४३), सतीश पांडुरंग खाडे (३५), अनिल मारोतराव मसराम (४७), दिनेश पांडुरंग नानवटे (४०), नयन सुधीर खानजोडे (२९), यश रवी मलकापुरे (३०) आणि अमित अनिल आडे (२५) यांचा समावेश आहे. हे सर्वजण वर्धा येथील सोमनाथ लेआउट, सिंधी मेघे येथील रहिवासी आहेत.

याशिवाय किरकोळ जखमींमध्ये प्रतिक रामदास शिरसकर (३१), अनुज अनिल आडे (२३), दुर्गेश यशवंत भिसेन (३०), आर्यन प्रभाकर वैद्य (१९), शुभम शामसुंदर ढबाले (३०) आणि प्रणय प्रभाकर ढोले (३३) यांचा समावेश आहे.

प्रशासनाची भूमिका आणि मदतकार्य

या भीषण अपघाताची माहिती मिळताच धामणगाव नगराध्यक्ष अर्चना अडसड रोठे यांनी तातडीने धामणगाव ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. जखमी रुग्णांना वाहनाची उपलब्धता करून सावंगी मेघे येथील रुग्णालयात हलविण्यासाठी त्यांनी मदत केली. तसेच, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. महेश पाटील, पोलीस अधीक्षक अनिकेत कदम, चांदूर रेल्वेचे पोलीस उपविभागीय अधिकारी गिरीश ताथोड यांनी रात्री घटनास्थळी भेट दिली. दत्तापूरचे पोलीस निरीक्षक गजानन मेहत्रे आणि मंगरूळ दस्तगीरचे पोलीस निरीक्षक आत्राम यांनीही घटनास्थळावर धाव घेतली.

अतिवेग आणि नियमांचे उल्लंघन यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले ?

समृद्धी महामार्गावर गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक भीषण अपघात झाले आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळी वाहनचालकांची झोप येणे, अतिवेग आणि नियमांचे उल्लंघन यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या घटनेने पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावरील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

या अपघाताप्रकरणी धामणगाव रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सविस्तर तपास सुरू आहे. ट्रकचालकाविरुद्ध निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरू आहे. जखमींवर वर्धा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असून पाच जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

मराठवाडा अपडेट २४
विश्वासार्ह • वेगवान • निर्भीड

Related Posts

मराठवाड्याचा दुष्काळ संपवणार! जपानकडून वॉटर ग्रीडला २० हजार कोटींचा निधी, सहा धरणे जोडणार

मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी जायका (JICA) कडून २० हजार कोटी रुपयांच्या कर्जाला सकारात्मक प्रतिसाद; छत्रपती संभाजीनगर,…

ByByrushikesh Nov 7, 2026

नंदुरबार सामूहिक बलात्कार प्रकरण: पुराव्यांच्या त्रुटींमुळे मुंबई उच्च न्यायालयाकडून सर्व आरोपी निर्दोष मुक्त

पीडितेच्या साक्षीतील विसंगती, वैद्यकीय अहवालातील त्रुटी आणि डीएनए पुराव्याची अखंडता सिद्ध न झाल्याने न्यायालयाने खालच्या न्यायालयाचा निर्णय रद्द…

ByByrushikesh Nov 7, 2026

३० लाख द्या अन् दोन मुलांना नोकरी लावा, नाहीतर जेसीबी जाळू”; पोलिसांसमोरच धमकी, कंपनीच्या सुरक्षारक्षकासह आई-वडिलांवर गुन्हा

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात अवादा एनर्जीच्या पवनचक्की प्रकल्पाचे काम अडवून ३० लाख रुपयांची खंडणी आणि दोन मुलांना नोकरीची…

ByByrushikesh Nov 6, 2026

व्हिडिओकॉनचं २० हजार कोटींचं साम्राज्य कोसळलं; वेणुगोपाल धूत अधिकृतपणे दिवाळखोर घोषित

छ. संभाजीनगर : एकेकाळी भारतीय मध्यमवर्गीय कुटुंबांच्या स्वप्नांचा भाग असलेला आणि ‘प्रत्येक घराची पसंती’ म्हणून ओळखला जाणारा व्हिडिओकॉन…

ByByrushikesh Nov 6, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top