• Home
  • Agriculture
  • बीड मनरेगा घोटाळा: नांदूरघाट ग्रामपंचायतीत १ कोटी ३ लाखांचा अपहार, अधिकारी-सहाय्यकावर गुन्हा
Image

बीड मनरेगा घोटाळा: नांदूरघाट ग्रामपंचायतीत १ कोटी ३ लाखांचा अपहार, अधिकारी-सहाय्यकावर गुन्हा

बीड जिल्ह्यातील नांदूरघाट ग्रामपंचायतीत मनरेगा अंतर्गत १.०३ कोटींचा महाघोटाळा उघडकीस आला आहे. सरपंचांनी ३३ लाख परत केले; मात्र ग्रामपंचायत अधिकारी व सहाय्यकाने ५८.५१ लाख न भरल्याने केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

बीडमध्ये मनरेगा महाघोटाळा उघड; अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

बीड जिल्ह्यातील नांदूरघाट ग्रामपंचायतीत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (MGNREGA) कामांमध्ये तब्बल १ कोटी ३ लाख ८९ हजार ४८० रुपयांचा अपहार झाल्याचे प्रशासकीय चौकशीत उघड झाले आहे. याप्रकरणी आरोपींना वसुलीची नोटीस देण्यात आली होती; मात्र ग्रामपंचायत अधिकारी आणि ग्रामरोजगार सहाय्यक यांनी ५८ लाख ५१ हजार ५८१ रुपये परत न भरल्याने केज पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

चौकशी समितीचा अहवाल; पाच जणांवर ठपका

नांदूरघाट ग्रामपंचायतीतील विकासकामांमध्ये झालेल्या गैरव्यवहाराबाबत वरिष्ठ पातळीवर तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार विशेष चौकशी समिती नेमण्यात आली. समितीने कागदपत्रांची तसेच प्रत्यक्ष कामांची तपासणी केली असता १ कोटी ३ लाख ८९ हजार रुपयांची अफरातफर झाल्याचे स्पष्ट झाले. चौकशी समितीने सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामरोजगार सहाय्यक, शाखा अभियंता आणि तांत्रिक अधिकारी या पाचही जणांना जबाबदार धरले.

सरपंचांसह तिघांनी परत केले ४५ लाख

समितीच्या अहवालानंतर या पाचही आरोपींना वसुलीची नोटीस बजावण्यात आली होती. त्यानुसार सरपंच सुनीता युवराज जाधव यांनी सर्वाधिक ३३ लाख १५ हजार १४७ रुपये परत केले.तर शाखा अभियंता आणि तांत्रिक अधिकाऱ्यांनी आपापल्या वाट्याची रक्कम जमा केली. अशा प्रकारे सरपंचांसह तीन जणांनी एकूण ४५ लाख ३७ हजार रुपये परत केले.

अधिकारी-सहाय्यकाकडून वसुली न होताच गुन्हा दाखल

मात्र ग्रामपंचायत अधिकारी आणि ग्रामरोजगार सहाय्यक या दोघांनी आपल्या वाट्याची रक्कम भरण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे या दोघांविरुद्ध ५८ लाख ५१ हजार ५८१ रुपयांच्या न भरलेल्या रकमेप्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

आठ रस्ते फक्त कागदावरच; ५९ लाखांचा निधी उचलला

या घोटाळ्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत आठ रस्ते फक्त कागदावरच दाखवून ५९ लाख रुपयांचा निधी उचलल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तांत्रिक सहायक आणि ग्रामरोजगार सेवक या दोघांना बडतर्फ केले असून, ग्रामसेवक व शाखा अभियंता यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच सरपंचांच्या अपात्रतेचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांना पाठवण्यात आला आहे.

केज तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत भ्रष्टाचाराच्या जाळ्यात

केज तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या नांदूरघाटमध्ये झालेला हा भ्रष्टाचार बीड जिल्ह्यासाठी धक्कादायक आहे. बीड जिल्ह्यात प्रथमच ग्रामपंचायत स्तरावर एवढ्या मोठ्या रकमेच्या वसुलीचे आदेश देण्यात आले होते. सुरुवातीला तीन दिवसांत रक्कम न भरल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा २४ ऑगस्ट २०२६ रोजी देण्यात आला होता.

या घोटाळ्याने ग्रामीण भागातील गोरगरीब मजुरांना हक्काचा रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेला भ्रष्टाचाराची कीड लागल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. आगामी काळात घरकुल, विहीर व इतर कामांमधील गैरव्यवहारही समोर येण्याची शक्यता असल्याने प्रशासनाकडून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Posts

LPG e-KYC: एजन्सी पैसे मागतेय? एक पैसाही देऊ नका; 30 सप्टेंबरपर्यंत हे काम कराच

आधार आधारित बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन (BAA) 30 सप्टेंबर 2026 पर्यंत पूर्ण करणे अनिवार्य; 1 ऑक्टोबरपासून सबसिडीयुक्त सिलिंडरसाठी आधार ऑथेंटिकेशन…

ByByrushikesh Sep 24, 2026

मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय! लाऊडस्पीकर वाजवायचा असेल तर मंडळांना जमा करावे लागणार 1 लाख रुपये

मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! लाऊडस्पीकर वापरण्यासाठी मंडळांना 1 लाख रुपयांची अनामत रक्कम भरावी लागणार मुंबई: गणेशोत्सवासह सर्व…

ByByrushikesh Sep 24, 2026

रविवारीही बँका सुरू, ३ दिवसांच्या देशव्यापी बँक संपापूर्वी सरकारचा मास्टरस्ट्रोक.

बँक कर्मचारी संघटनांनी २८ ते ३० सप्टेंबर २०२६ दरम्यान तीन दिवसांच्या देशव्यापी संपाची हाक दिल्यानंतर, ग्राहकांना दिलासा देण्यासाठी…

ByByrushikesh Sep 24, 2026

‘नो युपीआय डे’: 2 ऑक्टोबरला क्यूआर कोड काळ्या कापडाने झाकणार; महाराष्ट्रासह देशभरातील 500 हून अधिक व्यापारी संघटना आंदोलनात

एमडीआर शुल्काच्या विरोधात देशभरातील व्यापारी संघटनांचे आंदोलन; गांधी जयंतीला क्यूआर कोड काळ्या कापडाने झाकून ‘गांधीगिरी’चा मार्ग मुंबई: युपीआय…

ByByrushikesh Sep 24, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top