• Home
  • Agriculture
  • “वाल्मिक कराडने तुरुंगातून रचला कट ? ; बजरंग सोनवणे यांचा स्फोट, बीड कारागृहाची ७ तास झडती
Image

“वाल्मिक कराडने तुरुंगातून रचला कट ? ; बजरंग सोनवणे यांचा स्फोट, बीड कारागृहाची ७ तास झडती

बीड कारागृह खळबळ: खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलाला अडकवण्याचा कट? ऑडिओ क्लिपने वाढवली चर्चा; डीआयजींची सात तास झडती

बीड: जिल्ह्यातील विलास घुले हत्या प्रकरणाने वेगळे वळण घेतले असून, या प्रकरणावरून बीडचे राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलेले दिसत आहे. खासदार बजरंग सोनवणे यांनी गुरुवारी (१ ऑक्टोबर) पत्रकार परिषद घेत धक्कादायक आरोप केला आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड हा तुरुंगातूनच आपल्या मुलाला विलास घुले हत्या प्रकरणात अडकवण्याचा कट रचत असल्याचा आरोप सोनवणे यांनी केला. एवढेच नाही, तर एक ऑडिओ क्लिप पत्रकार परिषदेत ऐकवल्यानंतर मोठी खळबळ उडाली. या आरोपानंतर छत्रपती संभाजीनगर विभागाचे कारागृह उपमहानिरीक्षक (डीआयजी) योगेश देसाई यांच्या पथकाने बीड जिल्हा कारागृहाची तब्बल सात तास झडती घेतली आहे.

नेमकं काय घडलं?

खासदार बजरंग सोनवणे यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी वाल्मिक कराड आणि सुग्रीव कराड यांच्यातील जेलमधील संभाषणाची असल्याचा दावा केलेली ऑडिओ क्लिप ऐकवली. त्यात वाल्मिक कराड बोलत असल्याचे सोनवणे यांनी सांगितले. “खासदार बजरंग सोनवण्याच्या पोराला विलास घुले खून प्रकरणात अडकवा, त्याच्यावर गुन्हा दाखल करा. मृतदेह पोलीस ठाण्यात ठेवा, टाकीवर चढा… त्या गाबड्याला अडकवा,” असे वाल्मिक कराड बोलत असल्याचे सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. समोरची व्यक्ती “अण्णाजी अण्णाजी” म्हणत असल्याचाही त्यांनी दावा केला.

कारागृह प्रशासनाची भूमिका

खासदार सोनवणे यांच्या आरोपानंतर कारागृह विभाग हलचल झाली. छत्रपती संभाजीनगर विभागाचे कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांच्या पथकाने बीड जिल्हा कारागृहाची सात तास झडती घेतली. विशेष बाब म्हणजे, डीआयजी देसाई यांनी चौकशी करताना कारागृहातील अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना बाजूला ठेवल्याची माहिती आहे. त्यांनी स्वतः बराकमध्ये जाऊन कैद्यांची चौकशी केली. कारागृहात व्हीआयपी ट्रीटमेंट तसेच फोन कॉलच्या आरोपांबाबत त्यांनी स्वतः कायद्याकडून माहिती घेतली. यापूर्वीही कारागृहातील गैरप्रकारांबाबत दोन कर्मचाऱ्यांवर नुकतीच कारवाई करण्यात आली होती. आता डीआयजींच्या चौकशीत धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता असून, यानंतर कारागृहातील आणखी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार आहे.

कारागृह वर्षभरापासून चर्चेत

बीड जिल्हा कारागृह जवळपास वर्षभरापासून चर्चेत आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडसह अन्य आरोपी या कारागृहात बंदिस्त आहेत. त्यामुळे हे कारागृह अतिसंवेदनशील मानले जाते. दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी यापूर्वी कारागृहातील कैद्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याची तक्रार केली होती.

राजकीय वर्तुळात चर्चा

दुसरीकडे, धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या भेटीमागील नेमका उद्देश स्पष्ट झालेला नाही, मात्र बीडमधील सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.

डीआयजी योगेश देसाई यांच्या नेतृत्वाखालील पथकाची चौकशी सुरू असून, कारागृहातील अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वाल्मिक कराडच्या ऑडिओ क्लिपची स्वतंत्र तपासणी होण्याची गरज असून, या प्रकरणाचे राजकीय पडसादही उमटण्याची शक्यता आहे. मराठवाडा अपडेट २४ या घडामोडींवर लक्ष ठेवून आहे.

Related Posts

मराठवाड्याचा दुष्काळ संपवणार! जपानकडून वॉटर ग्रीडला २० हजार कोटींचा निधी, सहा धरणे जोडणार

मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी जायका (JICA) कडून २० हजार कोटी रुपयांच्या कर्जाला सकारात्मक प्रतिसाद; छत्रपती संभाजीनगर,…

ByByrushikesh Nov 7, 2026

आष्टीत वन्यप्राण्याचा कहर: शेतकरी देवीदास टकले यांचा मृत्यू; ५०० मीटर फरफटत नेले, वाघ की बिबट्या?

आष्टी तालुक्यातील देवळाली पानाची येथे गवत कापत असताना ३८ वर्षीय शेतकऱ्यावर हल्ला; मुलाला रक्ताचे डाग आणि ओढत नेल्याच्या…

ByByrushikesh Nov 7, 2026

नंदुरबार सामूहिक बलात्कार प्रकरण: पुराव्यांच्या त्रुटींमुळे मुंबई उच्च न्यायालयाकडून सर्व आरोपी निर्दोष मुक्त

पीडितेच्या साक्षीतील विसंगती, वैद्यकीय अहवालातील त्रुटी आणि डीएनए पुराव्याची अखंडता सिद्ध न झाल्याने न्यायालयाने खालच्या न्यायालयाचा निर्णय रद्द…

ByByrushikesh Nov 7, 2026

३० लाख द्या अन् दोन मुलांना नोकरी लावा, नाहीतर जेसीबी जाळू”; पोलिसांसमोरच धमकी, कंपनीच्या सुरक्षारक्षकासह आई-वडिलांवर गुन्हा

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात अवादा एनर्जीच्या पवनचक्की प्रकल्पाचे काम अडवून ३० लाख रुपयांची खंडणी आणि दोन मुलांना नोकरीची…

ByByrushikesh Nov 6, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top