• Home
  • Breaking News
  • बारामती विमानतळावर प्रशिक्षण विमानाचा अपघात; आठ महिन्यांत तिसरी घटना
Image

बारामती विमानतळावर प्रशिक्षण विमानाचा अपघात; आठ महिन्यांत तिसरी घटना

बारामती विमानतळावर रविवारी प्रशिक्षणार्थी विमान धावपट्टीवरून घसरले. विमानातील प्रशिक्षक व प्रशिक्षणार्थी सुरक्षित. डीजीसीए चौकशी सुरू. आठ महिन्यांत तिसरी घटना.

बारामती विमानतळावर प्रशिक्षण विमानाचा अपघात; आठ महिन्यांत तिसरी घटना

पुणे जिल्ह्यातील बारामती विमानतळावर रविवारी (९ ऑगस्ट) दुपारी प्रशिक्षण विमानाचा अपघात झाला. सरावादरम्यान विमान धावपट्टीवरून घसरले, मात्र सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. विमानातील प्रशिक्षक आणि प्रशिक्षणार्थी वैमानिक दोघेही सुरक्षित आहेत. विमानाचे मात्र किरकोळ नुकसान झाले आहे.

ही घटना दुपारी सुमारे १२:२५ वाजता घडली. ‘कार्व्हर एव्हिएशन’ (Academy of Carver Aviation) या खासगी कंपनीचे ‘सेस्ना सी१७२’ (Cessna C172) हे प्रशिक्षण विमान प्रशिक्षण सराव करत असताना धावपट्टीवरून घसरले. विमानाचा नोंदणी क्रमांक ‘व्हीटी-एसईएक्स’ (VT-SEX) असून ते डीजीसीए-मान्यताप्राप्त उड्डाण प्रशिक्षण संस्थेचे होते.

कशामुळे झाला अपघात?

उड्डाण प्रशिक्षणादरम्यान हा अपघात झाला. विमान ‘सर्किट अँड लँडिंग इमर्जन्सी’ (CL Emergencies) या प्रशिक्षण सरावासाठी उड्डाण करत होते. सरावाच्या वेळी विमानाने धावपट्टी २९ व ११ या दोन्ही धावपट्ट्यांवर ‘रिजेक्टेड टेक-ऑफ’ (रद्द केलेले उड्डाण) सराव केला. मात्र, सरावादरम्यान विमान धावपट्टीच्या पक्क्या भागात थांबू शकले नाही व ते धावपट्टी २९ च्या शेवटच्या भागाच्या पलीकडे उजव्या बाजूला घसरले.

विमानात प्रशिक्षक कॅप्टन चिराग शशिकांत डोईफोडे (वय २५) आणि प्रशिक्षणार्थी अभिजित जुंद्रे हे होते. दोघेही सुखरूप असून त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही.

विमानाचे नुकसान

अपघातात विमानाच्या प्रोपेलर, इंजिन काउलिंग व नोज लँडिंग गियरचे प्राथमिक स्वरूपाचे नुकसान झाले आहे. तज्ज्ञ अधिकारी विमानाच्या सविस्तर तपासणी करून खरे नुकसान किती आहे हे ठरवणार आहेत.

डीजीसीएची चौकशी सुरू

या अपघातानंतर नागरी उड्डाण महासंचालनालयाने (DGCA) तातडीने चौकशी सुरू केली आहे. डीजीसीएची हवाई सुरक्षा पथक घटनास्थळी जाऊन प्राथमिक चौकशी करणार आहे. या चौकशीत अपघाताची नेमकी कारणे व परिस्थिती उघड होण्याची शक्यता आहे. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयानेही या घटनेची दखल घेतली आहे.

आठ महिन्यांत तिसरी घटना

बारामती विमानतळावर आठ महिन्यांत ही तिसरी विमान अपघाताची घटना आहे. यापूर्वी २८ जानेवारी २०२६ रोजी लियरजेट ४५ विमान कोसळून झालेल्या अपघातात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला होता. तर १३ मे २०२६ रोजी ‘रेडबर्ड’ या प्रशिक्षण संस्थेचे विमान बारामतीतील गोजुबावी परिसरात कोसळले होते. त्याही घटनेत वैमानिक सुखरूप बचावला होता.

बारामती विमानतळावर वारंवार होणाऱ्या या अपघातांमुळे विमानतळाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Related Posts

मराठवाड्याचा दुष्काळ संपवणार! जपानकडून वॉटर ग्रीडला २० हजार कोटींचा निधी, सहा धरणे जोडणार

मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी जायका (JICA) कडून २० हजार कोटी रुपयांच्या कर्जाला सकारात्मक प्रतिसाद; छत्रपती संभाजीनगर,…

ByByrushikesh Nov 7, 2026

नंदुरबार सामूहिक बलात्कार प्रकरण: पुराव्यांच्या त्रुटींमुळे मुंबई उच्च न्यायालयाकडून सर्व आरोपी निर्दोष मुक्त

पीडितेच्या साक्षीतील विसंगती, वैद्यकीय अहवालातील त्रुटी आणि डीएनए पुराव्याची अखंडता सिद्ध न झाल्याने न्यायालयाने खालच्या न्यायालयाचा निर्णय रद्द…

ByByrushikesh Nov 7, 2026

३० लाख द्या अन् दोन मुलांना नोकरी लावा, नाहीतर जेसीबी जाळू”; पोलिसांसमोरच धमकी, कंपनीच्या सुरक्षारक्षकासह आई-वडिलांवर गुन्हा

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात अवादा एनर्जीच्या पवनचक्की प्रकल्पाचे काम अडवून ३० लाख रुपयांची खंडणी आणि दोन मुलांना नोकरीची…

ByByrushikesh Nov 6, 2026

व्हिडिओकॉनचं २० हजार कोटींचं साम्राज्य कोसळलं; वेणुगोपाल धूत अधिकृतपणे दिवाळखोर घोषित

छ. संभाजीनगर : एकेकाळी भारतीय मध्यमवर्गीय कुटुंबांच्या स्वप्नांचा भाग असलेला आणि ‘प्रत्येक घराची पसंती’ म्हणून ओळखला जाणारा व्हिडिओकॉन…

ByByrushikesh Nov 6, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top