• Home
  • Agriculture
  • अंबडचे सिंघम तहसीलदार विजय चव्हाण ACB च्या जाळ्यात, वाळू माफिया लाच प्रकरण….
Image

अंबडचे सिंघम तहसीलदार विजय चव्हाण ACB च्या जाळ्यात, वाळू माफिया लाच प्रकरण….

एका हातात कागद किंवा महत्वाच्या फाइल्स… सोशल मिडीयावर कायम active, डोळ्यावर गॉगल आणि सोशल मीडियावर लाखो व्ह्यूज मिळवणारा एक तहसीलदार. वाळू तस्करांसमोर छाती काढून उभा राहणारा, स्वतःच्या रिव्हॉल्वरमधून हवेत फायर करणारा तहसीलदार… त्याचे सोशल मिडीयावर व्हिडीओ पाहून लोक म्हणत होते, हा माणूस म्हणजे खरा सिंघम. पण या सिंघमच्या मुखवट्याखाली काय दडलेलं होतं हे जेव्हा उघड झालं, तेव्हा संपूर्ण महसूल विभाग हादरला. कारण हाच सिंघम वाळू माफियांकडून तब्बल १५ लाख रुपयांची लाच मागत होता. आणि तो पकडला गेला ? तर काय आहे हे संपूर्ण प्रकरण ? कोण आहे तो तहसीलदार आणि पोलिसांच्या जाळ्यात तो कसा सापडला सविस्तर पाहूया या व्हिडीओतून….
नमस्कार मी……. आणि तुम्ही पाहताय………
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्याचे तहसीलदार विजय चव्हाण म्हणजे मराठवाड्यातील एक ओळखीचे नाव. पदवीधर असलेले हे साहेब तहसीलदार होण्याआधी पोलीस अधिकारी म्हणूनही कार्यरत होते. सध्या ते तहसीलदार संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष आहेत आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकत्याच एका कार्यक्रमात त्यांच्या चांगल्या कामाबद्दल त्यांचा सत्कारही केला होता. म्हणजे एका बाजूला सरकारी सत्कार आणि दुसऱ्या बाजूला काळे धंदे, हे दुहेरी आयुष्य जगणाऱ्या या अधिकाऱ्याची खरी ओळख बीड जिल्ह्याच्या ACB ने जगासमोर आणली.
अंबड तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरीच्या काठावर अवैध वाळू उपसा हा वर्षानुवर्षांचा प्रकार आहे. दररोज जवळपास दोनशे हायवा गाड्यांमधून सुमारे दोन कोटी दहा लाख रुपयांची वाळू उचलली जाते. या धंद्यावर कारवाई न करता तो सुरू ठेवण्यासाठी कोणाचा तरी आशीर्वाद लागतो, आणि विजय चव्हाण हे तो आशीर्वाद देत होते पण त्यासाठी चांगलीच दक्षिणा घ्यायचे..
मागच्या वर्षी मे महिन्यात जेव्हा अंबड तालुक्यातील शहागड गावाजवळ गोदावरीच्या पात्रात वाळू तस्करी सुरू होती, तेव्हा चव्हाण स्वतः तिथे गेले. वाळू तस्करांनी त्यांच्यावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला, आणि त्यांनी थेट रिव्हॉल्वर काढून हवेत चार राऊंड फायर केले. तस्कर पळाले, चव्हाण एका रात्रीत हिरो झाले. अधिकारी असावा तर असा, म्हणून सोशल मीडियावर कौतुक होऊ लागले. शोशल मिडीयावर म्हणजेच फेसबुक इंस्ताग्राम वर ते व्हिडीओ पोस्ट करून ३० हजार फेसबुक फॉलोअर्स, हजारो इन्स्टाग्राम फॉलोअर्स आणि लाखो व्ह्यूज, सगळं जमवलेलं होतं. पण आता त्याच शोशल मिडीयावर लोक आता विचारत आहेत कि हे चार राऊंड फायर केले ते हप्ता न मिळाल्याचा स्टंट होता का?
कारण नंतर जे समोर आलं ते थक्क करणारं आहे. अंबड परिसरातील एका वाळू उपसा प्रकरणात चव्हाण यांनी तक्रारदारावर दबाव टाकायला सुरुवात केली. पोकलेन आणि सहा हायवा गाड्यांवर कारवाई न करण्यासाठी त्यांनी दिवसाला दीड लाख रुपये या दराने आठ दिवसांसाठी बारा लाख आणि प्रत्येक टिप्परमागे पन्नास हजार या दराने सहा टिप्परचे तीन लाख, असे एकूण तब्बल पंधरा लाख रुपये मागितले. तक्रारदाराने पहिला हप्ता आठ लाखाचा ठरवला, मात्र उर्वरित सात लाख द्यायची त्याची इच्छा नव्हती. शेवटी तडजोडीत हे प्रकरण सहा लाख चाळीस हजारावर आलं.
याची खबर तक्रारदाराने थेट बीड ACB ला दिली. ACB चे उपअधीक्षक सोपान चिटमपल्ले यांनी सापळा रचायला सुरुवात केली. पण विजय चव्हाण काही साधे नव्हते. त्यांना ACB ची धास्ती होती. तक्रारदाराला छत्रपती संभाजीनगरला बोलावलं, पण ट्रॅप होण्याच्या भीतीने तब्बल आठ वेळा भेटीचं ठिकाण बदललं. बीड बायपास ते झालटा फाटा अस तास-दोन तास फिरवत राहिले. पण एसीबीचे अधिकारी चव्हाणच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवून होते.
ज्या दिवशी हे नाटक सुरु होतं तो दिवस होता शनिवार. आणि त्याच दिवशी चव्हाण यांचा लग्नाचा वाढदिवस होता. घरी पाहुणे आले होते. केक कापायचं ठरलं होतं, हॉटेलमध्ये जेवायला जायचं होतं. पण या माणसाला लाचेच्या पैशाचा मोह आवरला नाही. सायंकाळी सहा वाजता छत्रपती संभाजीनगरमधील कासलीवाल मार्बल परिसरातील स्वतःच्या आलिशान बंगल्याबाहेर ते लाचेची पिशवी घ्यायला आले. तक्रारदाराने पैसे दिले, विशिष्ट इशारा केला, आणि क्षणार्धात दबा धरून बसलेल्या ACB च्या पथकाने त्यांना रंगेहात जेरबंद केलं. वाढदिवसाचा केक कापण्याआधीच साहेब ACB च्या कोठडीत पोहोचले होते.
अटकेनंतर जेव्हा त्यांच्या बंगल्याची झडती झाली, तेव्हा जे सापडलं ते बघून अधिकारी स्वतःच चकित झाले. एक लाख आठशे रुपयांची रोकड, नऊ तोळे सोनं, आठशे ग्रॅम चांदी, शंभर इंचाचा टीव्ही, एक अत्याधुनिक ड्रोन कॅमेरा हे सगळं एकट्या सरकारी पगारावर जमवणं शक्य नाही. शिवाय हातावर Apple कंपनीचं महागडं घड्याळ, दोन सोन्याच्या अंगठ्या आणि Samsung चा महागडा मोबाईल सापडला. आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे, ते अंबडला नोकरीला आणि राहायला मात्र छत्रपती संभाजीनगरला होते. त्या शहरात त्यांच्या नावावर एक रोहाऊस आणि एक फ्लॅट असल्याचेही आता समोर आलेय.
हे प्रकरण तिथेच थांबलेलं नाही. काही दिवसांतच या प्रकरणात एक मोठा ट्विस्ट आला. ज्या तक्रारदाराने ACB कडे धाव घेतली होती, त्यालाच आता अटक करण्यात आलेय. कारवाई करताना वाळू उपसा आणि तस्करीत त्याचा स्वतःचाही सहभाग उघड झाला. म्हणजे एकीकडे लाच देणारा आणि दुसरीकडे लाच घेणारा, दोघेही कायद्याच्या विळख्यात सापडले.
यापूर्वीही चव्हाण यांचा वादग्रस्त इतिहास आहे. सन २०२४ मध्ये छत्रपती संभाजीनगरच्या अब्दी मंडी परिसरातील अडीच एकर निर्वासित जमिनीच्या वादग्रस्त फेरफार आणि विक्री प्रकरणात त्यांच्यावर मोठा ठपका ठेवण्यात आला होता आणि विभागीय चौकशीनंतर त्यांना निलंबितही करण्यात आलं होतं. दोन वर्षांत दुसऱ्यांदा गंभीर कारवाई होणे हे काही साधे नाही.
या सगळ्यात आणखी एक गोष्ट ACB च्या तपासात आणि कॉल रेकॉर्डिंगमध्ये उघड झाली. चव्हाण वारंवार तक्रारदाराला सांगत होते, साहेबांनाही पैसे द्यावे लागतात. म्हणजे हा भ्रष्टाचाराचा एकट्याचा उद्योग नाही, वरून खाली येणारी एक साखळी आहे असं दिसतंय. तो साहेब नक्की कोण आहे, वरिष्ठ महसूल अधिकारी की थेट वरचं कोणी, याचा जून तपास सुरु आहे. शिवाय नांदेडच्या कंधार तालुक्यातून कुटुंबातील सदस्याला जिल्हा परिषद निवडणुकीत उभं करण्याची जोरदार तयारी चव्हाण करत होते, त्यावरही आता पाणी फेरलंय.
जोपर्यंत गोदाकाठी दिवसाला दोन कोटींची अवैध उलाढाल होतेय, तोपर्यंत असे तहसीलदार त्याचे वाटेकरी होत राहतील. आणि जोपर्यंत हे वाटेकरी आपल्या वरच्या साहेबांचे नाव सांगायला धजावत नाहीत, तोपर्यंत ही साखळी तुटणार नाही. खरा प्रश्न हा नाही की विजय चव्हाण सापडले. खरा प्रश्न आहे, त्यांचा तो साहेब कधी सापडणार? तुम्हाला काय वाटतंय ते साहेब कोण असतील ? तुमचे मत कॉमेंट मध्ये नक्की लिहा व्हिडीओला लाईक करा, chanel ला subscribe करा आणि बेल icon दाबायला विसरू नका….

Related Posts

सोनसाखळी हिसकावणाऱ्या टोळीवर संभाजीनगर मध्ये मोक्का

पहाटे पहाटे चांगल्या आरोग्यासाठी मोर्निंग वॉकला तुमच्यापैकी बरेच जन जात असतील. संभाजीनगर मध्ये असंच एक महिला नेहमीसारखी मॉर्निंग…

ByByrushikesh Jun 21, 2026

शिवसेना 60वा वर्धापन दिन

उद्धव ठाकरेंचे भावनिक आवाहन, शिंदें म्हणताय यह तो बस ट्रेलर है पूर्वी शिवसेनेचा वर्धापन दिन म्हटलं कि शिवसैनिक…

ByByrushikesh Jun 20, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top