• Home
  • Breaking News
  • कॉकरोच जनता पार्टीची संभाजीनगरमध्ये महत्त्वपूर्ण बैठक; होणार मोठा निर्णय
Image

कॉकरोच जनता पार्टीची संभाजीनगरमध्ये महत्त्वपूर्ण बैठक; होणार मोठा निर्णय

दिल्लीतील यशस्वी आंदोलनानंतर कॉकरोच जनता पार्टी (CJP) आता पुढील रणनीती ठरवण्यासाठी संभाजीनगरमध्ये दोन दिवसीय बैठक घेत आहे. पार्टीचे सर्व नेते उपस्थित राहणार.

छ. संभाजीनगरमध्ये CJP ने आयोजित केली बैठक

दिल्लीतील तरुणाईच्या यशस्वी चळवळीनंतर आता कॉकरोच जनता पार्टीने (CJP) पुढील दिशा निश्चित करण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी पार्टीची संपूर्ण टीम दिल्लीहून छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाली आहे.

५ आणि ६ तारखेला अभिजीत दिपके यांच्या निवासस्थानी ही दोन दिवसीय बैठक पार पडणार आहे. पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांका, सौरव दास यांच्यासह इतर वरिष्ठ पदाधिकारी संभाजीनगरमध्ये पोहोचले आहेत.

नेतृत्व करणार आम्ही तरुणाईला नवी दिशा – सौरव दास

कॉकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते सौरव दास यांनी पत्रकारांशी संवाद साधताना महत्त्वाची माहिती दिली. ते म्हणाले, “आमची ५ आणि ६ तारखेला दोन दिवसांची बैठक आहे. CJP चे सर्व नेते आणि प्रवक्ते या बैठकीला उपस्थित आहेत. या दोन दिवसांत आम्ही बसून सखोल चर्चा करू की पुढे आम्हाला कोणते पाऊल उचलायचे आहे.”

दास यांनी पुढे सांगितले की, “तरुणाईच्या या चळवळीला कोणत्या दिशेने न्यायचे हे आम्ही ठरवणार आहोत. ६ तारखेला आम्ही माध्यमांसमोर आमचा अंतिम निर्णय जाहीर करू.”

झारखंडच्या विद्यार्थ्यांना पाठिंबा

सौरव दास यांनी झारखंडमधील विद्यार्थी चळवळीबाबतही भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “झारखंडच्या सर्व विद्यार्थ्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे. अभिजीत दिपके आणि आशुतोष रांका यांनी त्यांच्याशी संवाद साधला आहे. या आंदोलनाला कशी दिशा मिळेल यावर आम्ही चर्चा करणार आहोत.”

या दोन दिवसीय बैठकीला CJP चे एकूण ७ सदस्य उपस्थित राहणार असून, पार्टीला सहकार्य करणाऱ्या इतर व्यक्तीही या बैठकीत सहभागी होणार आहेत.

अभिजीत दिपके यांच्याविरोधात पोलीस तक्रार

दरम्यान, CJP संस्थापक अभिजीत दिपके यांच्यावर दिल्लीत एका व्यक्तीने पोलीस तक्रार दाखल केली आहे. फैजान अन्सारी असे तक्रारदाराचे नाव असून, त्यांनी दिपके यांच्या सहकाऱ्यांनी आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप केला आहे.

सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर असलेल्या अन्सारी यांनी दिपके यांची त्वरित अटक करण्याची मागणी केली आहे. त्यांनी आंदोलनादरम्यान दिल्लीच्या मुख्यमंत्री आणि पोलिसांच्या कारवाईचे कौतुक केले असून, दिपके हे स्वार्थासाठी कार्यरत असल्याचा आरोप केला आहे.

पुढील वाटचाल कशी?

दिल्लीतील आंदोलनात यश मिळविल्यानंतर आता CJP ची पुढील भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या बैठकीतून पार्टी आपली पुढील रणनीती निश्चित करणार असून, तरुणाईच्या विविध प्रश्नांवर पुढील कार्यवाही करण्याचा निर्णय घेणार आहे.

६ तारखेला होणाऱ्या पत्रकार परिषदेत CJP आपला अधिकृत निर्णय सर्वांसमोर मांडणार आहे. या बैठकीच्या निर्णयावरून पक्षाच्या भविष्यातील वाटचालीचे चित्र स्पष्ट होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

Related Posts

मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय! लाऊडस्पीकर वाजवायचा असेल तर मंडळांना जमा करावे लागणार 1 लाख रुपये

मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! लाऊडस्पीकर वापरण्यासाठी मंडळांना 1 लाख रुपयांची अनामत रक्कम भरावी लागणार मुंबई: गणेशोत्सवासह सर्व…

ByByrushikesh Sep 24, 2026

‘नो युपीआय डे’: 2 ऑक्टोबरला क्यूआर कोड काळ्या कापडाने झाकणार; महाराष्ट्रासह देशभरातील 500 हून अधिक व्यापारी संघटना आंदोलनात

एमडीआर शुल्काच्या विरोधात देशभरातील व्यापारी संघटनांचे आंदोलन; गांधी जयंतीला क्यूआर कोड काळ्या कापडाने झाकून ‘गांधीगिरी’चा मार्ग मुंबई: युपीआय…

ByByrushikesh Sep 24, 2026

धाराशिवमध्ये पवन ऊर्जा प्रकल्पांना चोरीचा मोठा फटका; ८ महिन्यांत २० कोटींचे साहित्य चोरीस, प्रकल्प वर्षभर लांबणीवर

धाराशिवमधील पवन ऊर्जा प्रकल्पांमध्ये ८ महिन्यांत २० कोटींचे साहित्य चोरीस गेल्याने प्रकल्प एक वर्ष लांबले. चोरी आणि तोडफोडीमुळे…

ByByrushikesh Sep 24, 2026

फॉर्म ६ मध्ये बेकायदेशीर बदल? दोन निवडणूक आयुक्तांनी घेतला आक्षेप, नवमतदारांना मनस्तापाची भीती

नवीन मतदार नोंदणीसाठी वापरल्या जाणाऱ्या फॉर्म ६ मध्ये SIR शी संबंधित तीन प्रश्न जोडले; ऐच्छिक असूनही उत्तर दिल्याशिवाय…

ByByrushikesh Sep 24, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top