• Home
  • Breaking News
  • कोक्रोच जनता पार्टीचा मोठा प्लॅन! राकेश टिकैत यांची भेट, मोदींना चहूबाजूंनी वेढा घालण्याची तयारी
Image

कोक्रोच जनता पार्टीचा मोठा प्लॅन! राकेश टिकैत यांची भेट, मोदींना चहूबाजूंनी वेढा घालण्याची तयारी

शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मिळवून कॉकरोच जनता पार्टीने मोठे यश मिळवले. आता पक्षाने शेतकरी नेते राकेश टिकैत यांची भेट घेत मोदी सरकारविरोधात मोठी रणनीती आखली आहे. जाणून घ्या सविस्तर.

कॉकरोच जनता पार्टीने (सीजेपी) अलीकडेच दिल्लीतील जंतर मंतर येथे तब्बल एक महिना मोठे आंदोलन केले. या आंदोलनाला यश मिळाले आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. या यशानंतर आता कॉकरोच जनता पार्टीने पुढील मोठा डाव आखला आहे. पार्टीने प्रसिद्ध शेतकरी नेते आणि भारतीय किसान युनियनचे (बीकेयू) प्रमुख राकेश टिकैत यांची भेट घेतली आहे.

राकेश टिकैत यांची भेट का महत्त्वाची?

कॉकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांका यांनी मंगळवारी राकेश टिकैत यांची भेट घेतली. या बैठकीत सीजेपीचे इतर नेते आणि भारतीय किसान युनियनचे पदाधिकारी देखील उपस्थित होते.

या भेटीचा उद्देश विद्यार्थी, तरुण आणि शेतकरी यांना एकत्र आणून मोदी सरकारविरोधात एक व्यापक मोर्चा उभारण्याचा आहे. रांका यांनी पत्रकारांना सांगितले की, “आम्हाला आशा आहे की आमचे शेतकरी बंधू आणि देशातील विद्यार्थी व तरुण एकत्र येऊन मोदी सरकारला चहूबाजूंनी वेढा घालतील”.

नेमकी चर्चा काय झाली?

या बैठकीत भविष्यातील रणनीती आणि कार्यवाही आराखड्यावर चर्चा झाली. कॉकरोच जनता पार्टीने जंतर मंतर आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवर कारवाई न करण्याची मागणी करताना टिकैत यांचा पाठिंबा मागितला. पार्टीचे म्हणणे आहे की बिहार, पश्चिम बंगाल आणि राजस्थानमध्ये आंदोलक विद्यार्थ्यांविरोधात गुन्हे दाखल केले जात आहेत.

किसान युनियन आणि सीजेपीला एका मंचावर आणण्याचा हा प्रयत्न असल्याचे पार्टीने स्पष्ट केले. आगामी काळात दोन्ही संघटना मोठ्या संयुक्त आंदोलनाची घोषणा करू शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

शेतकऱ्यांचा अमेरिका-भारत व्यापार कराराला विरोध

दुसरीकडे, अमेरिका आणि भारत यांच्यातील प्रस्तावित व्यापार कराराला विरोध करण्यासाठी शेतकरी संघटना मोठ्या आंदोलनाची तयारी करत आहेत. राकेश टिकैत यांनी या कराराला ‘शेतकऱ्यांसाठी धोकादायक’ म्हटले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, या करारामुळे अमेरिकन कंपन्यांना भारतीय कृषी क्षेत्रात प्रवेश मिळेल, ज्याचा फटका स्थानिक शेतकऱ्यांना बसेल.

यापूर्वीच हरियाणा पोलिसांनी दिल्लीकडे कूच करणाऱ्या शेतकऱ्यांना सीमेवर रोखले होते. आता भारतीय किसान युनियनच्या वतीने या कराराविरोधात मोठे आंदोलन उभारण्याची शक्यता आहे. या आंदोलनात कॉकरोच जनता पार्टी सहभागी होईल की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, सीजेपी नेत्यांची टिकैत यांच्याशी झालेली भेट आता चर्चेचा विषय बनली आहे.

कॉकरोच चळवळीचे यश

कॉकरोच जनता पार्टी ही प्रत्यक्षात एक राजकीय पक्ष नसून एक व्यंग्यात्मक ऑनलाइन चळवळ आहे. भारताचे सरन्यायाधीश यांनी काही बेरोजगार तरुणांना ‘कॉकरोच’ म्हटल्यानंतर या चळवळीला जोर आला. तरुणांनी हा शब्द आपल्या ताकदीचे प्रतीक बनवले.

गेल्या पाच आठवड्यांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाला २६ दिवस उपोषण करणाऱ्या कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचा पाठिंबा मिळाला होता. नीट परीक्षेतील पेपरलीक प्रकरणी आणि इतर परीक्षा घोटाळ्यांविरोधात हे आंदोलन होते. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर सीजेपीने आपले आंदोलन मागे घेतले. मात्र, ही चळवळ आता नव्या उद्दिष्टांसह पुढे सरकण्याची शक्यता आहे.

Related Posts

नंदुरबार सामूहिक बलात्कार प्रकरण: पुराव्यांच्या त्रुटींमुळे मुंबई उच्च न्यायालयाकडून सर्व आरोपी निर्दोष मुक्त

पीडितेच्या साक्षीतील विसंगती, वैद्यकीय अहवालातील त्रुटी आणि डीएनए पुराव्याची अखंडता सिद्ध न झाल्याने न्यायालयाने खालच्या न्यायालयाचा निर्णय रद्द…

ByByrushikesh Nov 7, 2026

“उद्या ठाकरे-शिंदेही एकत्र येऊ शकतात” विधान परिषद निकालानंतर राजकीय खळबळ! शिंदेसेनेच्या नेत्याने म्हटलं

विधान परिषद निकालानंतर महायुतीत वाद चव्हाट्यावर; शिंदेसेनेचे नेते रवींद्र धंगेकर म्हणतात – उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे रक्त, तर एकनाथ…

ByByrushikesh Oct 30, 2026

मच्छीमार, मत्स्यशेतकऱ्यांना दिलासा; कागदपत्रांचा त्रास संपला, अनुदान थेट खात्यात जमा होणार,

राज्यातील मच्छीमार व मत्स्यशेतकऱ्यांसाठी शासनाच्या २४ योजनांचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी २.० प्रणालीवर ऑनलाइन अर्ज सुरू. अनुदान थेट आधार-संलग्न…

ByByrushikesh Oct 30, 2026

छ. संभाजीनगरच्या जालना रोडवर राज्यातील सर्वात मोठा उड्डाणपूल; १८ किमी लांबी, ५ हजार कोटींचा महाप्रकल्प! नव्या वर्षात भूमिपूजनाची शक्यता

चिकलठाणा ते वाळूज एमआयडीसी दरम्यान प्रस्तावित अखंड उड्डाणपुलाची मंत्र्यांनी केली पाहणी; नवीन वर्षात भूमिपूजनाचा नारळ फुटण्याची शक्यता, डीपीआरमध्ये…

ByByrushikesh Oct 28, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top