छत्रपती संभाजीनगर, मराठवाडा अपडेट 24 : कॉलेजमध्ये जाणाऱ्या एका सतरा वर्षीय तरुणीला रस्त्यात गाठून एका युवकाने तिची छेड काढली.मुलीच्या तक्रारीवरून वाळूज MIDC पोलिसांनी संशयित आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला.
तक्रारदार मुलगी वडगाव कोल्हाटीमध्ये राहते. ती बारावीमध्ये शिकत असून, त्यांच्याच कॉलनीमध्ये राहणाऱ्या गौरव सोबत तिची ओळख होती, गौरव माळोदे हा पत्नी व मुलांसह राहत होता. २३ जून रोजी सायंकाळी, मुलगी काही कामानिमित्त स्कुटीवरून दक्षिण हनुमान मंदिराकडून अण्णाभाऊ साठे चौकाकडे जात असताना, गौरवने तिचा पाठलाग केला आणि तिला मला तुझ्यासोबत बोलायचे आहे. असे म्हणाला.
पण त्या तरुणीने गौरवकडे दुर्लक्ष केले आणि ती घराच्या दिशेने गाडी चालवत राहिली. गौरव सुद्धा तिच्या मागे मागे घरापर्यंत पोहोचला. ही गोष्ट मुलीने आईला सांगताच त्या दोघींनी त्याचा शोध घेतला, पण तो दिसून आला नाही. नंतरच्या काळात कॉलेजच्या admission चे काम सुरू असल्याने मुलीने पोलिसांना तक्रार दिली नव्हती. पण आता तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.



















