chhatrapti sambhajinagar crime : जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ बेबी का मकबरा परिसरातून ही धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली.
छत्रपती संभाजीनगर मधून एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे.
एका विकृत प्रियकराने मकबऱ्याच्या आडोशाचा गैरफायदा घेत त्याच्याच प्रियशीचा एक अक्षपार्ह व्हिडिओ चोरून शूट केला. पुढे तो तरुणीला धमक्या देत होता. पण त्याच्या धमक्यांना न घाबरता, तरुणीने त्याच्यासोबतचा सगळा संपर्क तोडला. याचाच राग मनात धरून, त्या तरुणाने ते आक्षेपार्ह व्हिडिओ तिच्या सख्ख्या भावाला व्हाट्सअपवर पाठवले. या प्रकरणा नंतर त्या विकृत संशयित आरोपी विरोधात बेगमपुरा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार पिडीत तरुणी आणि संशयित आरोपी सागर राठोड यांच्यात गेल्या काही दिवसापासून प्रेम संबंध होते. पण संशयित आरोपी सागरचे वागणे पटत नसल्याने पिडीत तरुणीने संपर्क तोडला होता.
पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखीन पोडील तापस सुरु केला आहे.















