• Home
  • Breaking News
  • बारामतीत पोलीस हवालदाराला ५ लाखांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले

बारामतीत पोलीस हवालदाराला ५ लाखांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले

बारामती तालुका पोलीस ठाण्यातील हवालदार महेश उगले याला झुंबा क्लासवरील कारवाई टाळण्यासाठी ५ लाखांची लाच घेताना ACB Pune ने पकडले. ७ लाख मागणी, २ लाख आधीच घेतले होते.

बारामतीमधून पोलीस प्रशासनाची लाजिरवाणी घटना समोर आली आहे. स्थानिक झुंबा डान्स क्लास आणि जिमवर कारवाई न करण्यासाठी तब्बल ५ लाख रुपयांची लाच घेताना एका पोलीस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली असून, भ्रष्टाचाराविरोधातील मोहिमेला बळ मिळाले आहे.

बारामती तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस हवालदार महेश उगले याला ACB ने मंगळवारी (८ सप्टेंबर) माळेगाव रोड परिसरातून अटक केली. त्याच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार आणि त्यांच्या पत्नी बारामतीत झुंबा डान्स क्लास आणि जिमचा व्यवसाय चालवतात. त्यांच्या व्यवसायावरून स्थानिक रहिवाशांनी केलेल्या तक्रारीचा गैरफायदा घेत, हवालदार उगले यांनी कारवाई टाळण्याच्या बदल्यात मोठ्या प्रमाणात लाचेची मागणी केली होती.

७ लाखांची मागणी, २ लाख आधीच वसूल

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हवालदाराने कारवाई न करण्यासाठी सुरुवातीला तब्बल ७ लाख रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी २ लाख रुपये त्याने तक्रारदाराकडून आधीच घेतले होते. उर्वरित ५ लाख रुपयांसाठी त्याने तक्रारदाराला सातत्याने त्रास देत होता. या सातत्यपूर्ण त्रासाला कंटाळून तक्रारदाराने पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB Pune) धाव घेतली.

ACB चा सापळा, रंगेहाथ पकडले

ACB Pune च्या पथकाने तक्रारीची पडताळणी केली आणि हवालदार उगले यांची लाचेची मागणी बरोबर असल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर ACB ने बारामतीतील माळेगाव रोडवरील PDCC बँकेजवळ सापळा रचला. जेव्हा हवालदार उगले यांनी तक्रारदाराकडून उर्वरित ५ लाख रुपये हातात घेतले, तेव्हाच ACB पथकाने त्यांना अक्षरशः रंगेहाथ पकडले.

काय आहे आरोप?

हवालदार महेश उगले यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ च्या कलम ७, १२, १३(१)(ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या त्यांची चौकशी सुरू असून, पोलीस प्रशासनाने या प्रकरणी गांभीर्याने दखल घेतली आहे. या घटनेमुळे बारामती पोलीस ठाण्यातील इतर अधिकाऱ्यांमध्ये देखील खळबळ उडाली आहे.

Related Posts

नंदुरबार सामूहिक बलात्कार प्रकरण: पुराव्यांच्या त्रुटींमुळे मुंबई उच्च न्यायालयाकडून सर्व आरोपी निर्दोष मुक्त

पीडितेच्या साक्षीतील विसंगती, वैद्यकीय अहवालातील त्रुटी आणि डीएनए पुराव्याची अखंडता सिद्ध न झाल्याने न्यायालयाने खालच्या न्यायालयाचा निर्णय रद्द…

ByByrushikesh Nov 7, 2026

कोला-चॉकलेटनंतर अंबानी बिस्किट बाजारात; ५ रुपयांत ९ नवे व्हेरिएंट्स

रिलायन्स कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडनं ‘इंडिपेंडन्स’ ब्रँडअंतर्गत ९ नव्या बिस्किट व्हेरिएंट्सची घोषणा केली असून, एकूण २८ नवे एसकेयू बाजारात…

ByByrushikesh Nov 3, 2026

“उद्या ठाकरे-शिंदेही एकत्र येऊ शकतात” विधान परिषद निकालानंतर राजकीय खळबळ! शिंदेसेनेच्या नेत्याने म्हटलं

विधान परिषद निकालानंतर महायुतीत वाद चव्हाट्यावर; शिंदेसेनेचे नेते रवींद्र धंगेकर म्हणतात – उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे रक्त, तर एकनाथ…

ByByrushikesh Oct 30, 2026

मच्छीमार, मत्स्यशेतकऱ्यांना दिलासा; कागदपत्रांचा त्रास संपला, अनुदान थेट खात्यात जमा होणार,

राज्यातील मच्छीमार व मत्स्यशेतकऱ्यांसाठी शासनाच्या २४ योजनांचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी २.० प्रणालीवर ऑनलाइन अर्ज सुरू. अनुदान थेट आधार-संलग्न…

ByByrushikesh Oct 30, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top