• Home
  • Beed
  • बॅनर फाडल्याच्या कारणावरून तरुणाची हत्या
Image

बॅनर फाडल्याच्या कारणावरून तरुणाची हत्या

बीडच्या केज तालुक्यात खळबळ

बीड, प्रतिनिधी: राज्यात वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमध्ये बीड जिल्ह्याचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. जिल्ह्यातील केज तालुक्यात बॅनर फाडल्याच्या शुल्लक वादातून एका तरुणाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, केज तालुक्यातील टाकळी येथील विलास घुले या तरुणाची कदमवाडी फाटा परिसरातील हॉटेल गावकरी येथे रात्रीच्या सुमारास चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. बॅनर फाडल्याच्या किरकोळ कारणावरून हा वाद झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

या घटनेनंतर संतप्त नातेवाईक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने केज पोलीस ठाण्यात दाखल झाले. आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, केज येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ग्रामस्थ व नातेवाईकांनी दोन वेळा रास्ता रोको आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. संबंधित आरोपींविरुद्ध कारवाईची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास केज पोलीस करत आहेत.

बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने गुन्हेगारीच्या घटना समोर येत असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Related Posts

देवाच्या दारात मृत्यूचा तांडव, यशवाडी मंदिर दुर्घटना

देवाच्या दारात आलेल्या माणसाचा अपघाती जीव गेला तर त्यासाठी कुणाला जबाबदार धरायचं? देवाला की माणसाला? परभणीच्या यशवाडी गावात…

ByByrushikesh Jun 22, 2026

सोनसाखळी हिसकावणाऱ्या टोळीवर संभाजीनगर मध्ये मोक्का

पहाटे पहाटे चांगल्या आरोग्यासाठी मोर्निंग वॉकला तुमच्यापैकी बरेच जन जात असतील. संभाजीनगर मध्ये असंच एक महिला नेहमीसारखी मॉर्निंग…

ByByrushikesh Jun 21, 2026

शिवसेना 60वा वर्धापन दिन

उद्धव ठाकरेंचे भावनिक आवाहन, शिंदें म्हणताय यह तो बस ट्रेलर है पूर्वी शिवसेनेचा वर्धापन दिन म्हटलं कि शिवसैनिक…

ByByrushikesh Jun 20, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top