• Home
  • Breaking News
  • लाडकी बहिण योजनेत आता १५०० ऐवजी मिळणार २१०० रुपये ?
Image

लाडकी बहिण योजनेत आता १५०० ऐवजी मिळणार २१०० रुपये ?

EAC-PM च्या अहवालाने महागाईच्या पार्श्वभूमीवर रकमेत वाढ करण्याची शिफारस केली आहे. वाचा सविस्तर…

मराठवाडा अपडेट 24 : महाराष्ट्राच्या राजकारणात ‘गेमचेंजर’ ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना १,५०० रुपयांऐवजी २,१०० रुपये मिळणार आहेत अशी चर्चा सुरु आहे. महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी ही रक्कम वाढवण्याचे आश्वासन दिले होते. आता पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने (EAC-PM) सादर केलेल्या अहवालाने या चर्चेला पुन्हा एकदा तोंड फुटले आहे.

सादर केलेल्या अहवालात काय म्हटले आहे ?

या अहवालात म्हटले आहे की, लाडकी बहीणसारख्या योजनांच्या रकमेची वेळोवेळी समीक्षा करण्याची गरज आहे. महागाई वाढल्याने आणि कुटुंबांच्या खर्चात झालेल्या बदलामुळे गरज पडल्यास ती रोख रक्कम वाढवली पाहिजे. तसेच, या योजना “सुरू ठेवल्या पाहिजेत आणि ‘कॅश-प्लस’ स्वरूपात विकसित केल्या पाहिजेत” अशी शिफारसही करण्यात आली आहे.

२१०० रुपये कधी पासून सुरु होणार ?

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीने लाडकी बहीण योजनेची रक्कम १,५०० वरून २,१०० रुपये करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, सत्तेत आल्यानंतरही याबाबत अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही

यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले ?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे. ते म्हणाले, “लाडक्या बहिणींना योग्य वेळी ही रक्कम २,१०० रुपये करण्यात येईल. आम्ही आमच्या बहिणींना दिलेला शब्द पूर्ण करू”

Related Posts

LPG e-KYC: एजन्सी पैसे मागतेय? एक पैसाही देऊ नका; 30 सप्टेंबरपर्यंत हे काम कराच

आधार आधारित बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन (BAA) 30 सप्टेंबर 2026 पर्यंत पूर्ण करणे अनिवार्य; 1 ऑक्टोबरपासून सबसिडीयुक्त सिलिंडरसाठी आधार ऑथेंटिकेशन…

ByByrushikesh Sep 24, 2026

मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय! लाऊडस्पीकर वाजवायचा असेल तर मंडळांना जमा करावे लागणार 1 लाख रुपये

मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! लाऊडस्पीकर वापरण्यासाठी मंडळांना 1 लाख रुपयांची अनामत रक्कम भरावी लागणार मुंबई: गणेशोत्सवासह सर्व…

ByByrushikesh Sep 24, 2026

रविवारीही बँका सुरू, ३ दिवसांच्या देशव्यापी बँक संपापूर्वी सरकारचा मास्टरस्ट्रोक.

बँक कर्मचारी संघटनांनी २८ ते ३० सप्टेंबर २०२६ दरम्यान तीन दिवसांच्या देशव्यापी संपाची हाक दिल्यानंतर, ग्राहकांना दिलासा देण्यासाठी…

ByByrushikesh Sep 24, 2026

‘नो युपीआय डे’: 2 ऑक्टोबरला क्यूआर कोड काळ्या कापडाने झाकणार; महाराष्ट्रासह देशभरातील 500 हून अधिक व्यापारी संघटना आंदोलनात

एमडीआर शुल्काच्या विरोधात देशभरातील व्यापारी संघटनांचे आंदोलन; गांधी जयंतीला क्यूआर कोड काळ्या कापडाने झाकून ‘गांधीगिरी’चा मार्ग मुंबई: युपीआय…

ByByrushikesh Sep 24, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top