• Home
  • Breaking News
  • अमिताभ, आमिर, अक्षय आणि सलमानच्या घरांची रेकी, मग टायगर श्रॉफवरच हल्ला का? आरोपींनी सांगितलं खरं कारण
Image

अमिताभ, आमिर, अक्षय आणि सलमानच्या घरांची रेकी, मग टायगर श्रॉफवरच हल्ला का? आरोपींनी सांगितलं खरं कारण

लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित आरोपींनी सुरुवातीला अमिताभ बच्चन, आमिर खान, अक्षय कुमार आणि सलमान खान यांच्या घरांची रेकी केली; मात्र कडक सुरक्षेमुळे प्लॅन बदलून सुरक्षाविहीन असलेल्या टायगर श्रॉफवर गोळीबार करण्यात आल्याचा पोलिस तपासातील दावा.

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराच्या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या तपासात धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित असल्याचा आरोप असलेल्या तीन आरोपींनी चौकशीत सांगितले की, त्यांनी सुरुवातीला अमिताभ बच्चन, आमिर खान, अक्षय कुमार आणि सलमान खान या चार दिग्गज कलाकारांच्या घरांची रेकी केली होती. मात्र, या कलाकारांभोवती असलेला कडक सुरक्षेचा पहारा पाहून त्यांनी आपली योजना बदलली आणि सुरक्षाविहीन असलेल्या टायगर श्रॉफला लक्ष्य केले.

ही घटना १८ ऑक्टोबर २०२६ रोजी संध्याकाळी सुमारे ७ वाजता मुंबईतील जुहू परिसरात घडली. टायगर श्रॉफ फुटबॉल खेळून परतत असताना त्याच्या कारवर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. या घटनेत टायगर बालबाल बच्च बचावला, मात्र त्याचा ड्रायव्हर आणि एक रिक्षाचालक जखमी झाला. गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित अनिल पंडित आणि हरमन संधू यांनी एका ऑडिओ क्लिपद्वारे घेतली आहे.

नेमकं काय घडलं?

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ऋतिक (रोशन), रेहान आणि फूल सिंह हे सुमारे एक महिन्यापूर्वी मुंबईत आले होते. त्यांनी रिक्षाचालकांच्या मदतीने अमिताभ बच्चन, आमिर खान, अक्षय कुमार आणि सलमान खान यांच्या घरांची रेकी केली आणि त्या ठिकाणचे व्हिडिओ आपल्या विदेशातील हँडलरकडे पाठवले.

मात्र, या सर्व दिग्गज कलाकारांच्या घराबाहेर कडक सुरक्षा असल्याचे लक्षात आल्यावर आरोपींनी आपला मूळचा प्लॅन बदलला. त्यांना सांगण्यात आले होते की, कमी सुरक्षा असलेल्या सेलिब्रिटीला लक्ष्य करायचे आहे. याच दरम्यान, एका रिक्षाचालकाने त्यांना सांगितले की टायगर श्रॉफ दर रविवारी जुहूतील मैदानावर फुटबॉल खेळतो आणि त्याच्यासोबत फक्त ड्रायव्हर असतो.

टायगरचं टार्गेट का निवडलं?

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी ११ ऑक्टोबर रोजीही फुटबॉल मैदानावर जाऊन पाहणी केली होती, मात्र त्या दिवशी टायगर आला नाही. त्यानंतर १८ ऑक्टोबर रोजी ते पुन्हा मैदानावर गेले आणि यावेळी त्यांच्याकडे शस्त्रे होती. टायगरची कार मैदानाबाहेर पडताच त्यांनी गोळीबार केला आणि पळ काढला.

तपासात असे समोर आले आहे की, सलमान खान हा या गँगचा मूळचा टार्गेट होता. मात्र, सलमानच्या बांद्रा येथील घराबाहेर असलेल्या कडक सुरक्षेमुळे आरोपींना तिथे काहीच करता आले नाही. त्यामुळेच त्यांनी टायगर श्रॉफला “सोपा पर्याय” म्हणून निवडल्याचे पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे.

प्रशासनाची भूमिका आणि पुढील तपास

घटनेनंतर मुंबई पोलिसांनी तातडीने कारवाई करत तीन मुख्य आरोपींना राजस्थानच्या कोटा येथून अटक केली. त्यांना मुंबईत आणण्यात आले असून सध्या त्यांची अँटी-एक्स्टॉर्शन सेलकडे चौकशी सुरू आहे. दरम्यान, टायगर श्रॉफला पोलिस संरक्षण देण्यात आले असून त्याच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेत बिश्नोई गँगविरुद्ध कडक कारवाईचे संकेत दिले आहेत.

Related Posts

मराठवाड्याचा दुष्काळ संपवणार! जपानकडून वॉटर ग्रीडला २० हजार कोटींचा निधी, सहा धरणे जोडणार

मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी जायका (JICA) कडून २० हजार कोटी रुपयांच्या कर्जाला सकारात्मक प्रतिसाद; छत्रपती संभाजीनगर,…

ByByrushikesh Nov 7, 2026

नंदुरबार सामूहिक बलात्कार प्रकरण: पुराव्यांच्या त्रुटींमुळे मुंबई उच्च न्यायालयाकडून सर्व आरोपी निर्दोष मुक्त

पीडितेच्या साक्षीतील विसंगती, वैद्यकीय अहवालातील त्रुटी आणि डीएनए पुराव्याची अखंडता सिद्ध न झाल्याने न्यायालयाने खालच्या न्यायालयाचा निर्णय रद्द…

ByByrushikesh Nov 7, 2026

३० लाख द्या अन् दोन मुलांना नोकरी लावा, नाहीतर जेसीबी जाळू”; पोलिसांसमोरच धमकी, कंपनीच्या सुरक्षारक्षकासह आई-वडिलांवर गुन्हा

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात अवादा एनर्जीच्या पवनचक्की प्रकल्पाचे काम अडवून ३० लाख रुपयांची खंडणी आणि दोन मुलांना नोकरीची…

ByByrushikesh Nov 6, 2026

व्हिडिओकॉनचं २० हजार कोटींचं साम्राज्य कोसळलं; वेणुगोपाल धूत अधिकृतपणे दिवाळखोर घोषित

छ. संभाजीनगर : एकेकाळी भारतीय मध्यमवर्गीय कुटुंबांच्या स्वप्नांचा भाग असलेला आणि ‘प्रत्येक घराची पसंती’ म्हणून ओळखला जाणारा व्हिडिओकॉन…

ByByrushikesh Nov 6, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top