• Home
  • Breaking News
  • कॉकरोच जनता पार्टीचं दिल्लीत पुन्हा आंदोलन; कोर्टाने दिला ‘हा’ मोठा दणका
Image

कॉकरोच जनता पार्टीचं दिल्लीत पुन्हा आंदोलन; कोर्टाने दिला ‘हा’ मोठा दणका

कॅनॉट प्लेसच्या सेंट्रल पार्कमध्ये उद्या तिरंगा आंदोलनाची घोषणा; आंदोलन रोखण्यासाठी दाखल याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी सुरू.

कॉकरोच जनता पार्टीने (CJP) उद्या, म्हणजेच 16 ऑक्टोबर रोजी दिल्लीत पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनाला अटकाव करण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे उद्या आंदोलन होणार की नाही, याचा फैसला आज दिल्ली न्यायालयात होणार असून कोर्टाच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी एक्स (पूर्वीचं ट्विटर) पोस्टद्वारे ही घोषणा केली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, ‘लहरा दो तिरंगा, 16 ऑक्टोबर को कनॉट प्लेस के सेंट्रल पार्क में शाम 5 बजे’. या आंदोलनाचं नेतृत्व स्वतः दीपके करणार असून, त्यांनी देशभक्तांना हातात तिरंगा घेऊन सेंट्रल पार्कमध्ये येण्याचं आवाहन केलं आहे.

आंदोलन का होत आहे?

या आंदोलनामागचं मुख्य कारण म्हणजे CJP चे प्रवक्ते सौरव दास आणि आशुतोष रांका यांना अटक करण्यात आली आहे. जंतर-मंतरवर तिरंगा फडकवला म्हणून दिल्ली पोलिसांनी या दोघांना अटक केली होती. त्यांना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून तिहार तुरुंगात पाठवण्यात आलं आहे. जंतर-मंतरवर अनधिकृतपणे घुसखोरी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

अभिजीत दीपके यांनी या अटकेला आव्हान देताना म्हटलं आहे की, “तिरंगा आमचा स्वाभिमान आहे. तिरंगा फडकावणं हा आमचा अधिकार आहे. तो काही गुन्हा नाहीये. हे या हुकूमशाहाला दाखवून द्यायचं आहे. कदाचित उद्या मला पुन्हा तुरुंगात टाकतील. पण मला त्याची पर्वा नाही. आम्ही तिरंगा फडकवणारच आहोत.”

दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल

दिल्लीत उद्या होणाऱ्या या आंदोलनावर याचिकेचं सावट आहे. कॅनॉट प्लेस हे आंदोलनाचं ठिकाण नाही, असा मुद्दा याचिकाकर्त्यांनी याचिकेत उपस्थित केला आहे. ‘यावेळी हे कॅनॉट प्लेसच्या अगदी मध्यभागी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. आंदोलक सीपी बंद करणार आहेत,’ असं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे.

सीनियर एडवोकेट सचिन पुरी यांनी दिल्ली उच्च न्यायालयाचे कार्यवाहक मुख्य न्यायाधीश नितिन वी. साम्ब्रे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर हा मामला मांडला आणि या प्रदर्शनावर तातडीने रोक लावण्याची मागणी केली. याचिकेत असंही नमूद करण्यात आलं आहे की, या प्रकारच्या आंदोलनांमुळे दिल्लीत भारी वाहतूक कोंडी होते आणि सेंट्रल दिल्लीतील दुकानदारांचं मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होतं.

मात्र, दिल्ली उच्च न्यायालयाने सकाळच्या सत्रात या मामल्यावर कोणतेही तात्काळ निर्देश जारी करण्यास नकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयात दिल्लीतील आंदोलन स्थळे आणि सार्वजनिक नियमांसंदर्भात सुनावणी सुरू असल्याने, या मामल्याची सुनावणी दुपारपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. आता दिल्ली उच्च न्यायालय काय निर्णय देणार, याकडे देशाचं लक्ष लागलं आहे.

पुढे काय होणार?

सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी झाल्यावर दुपारी हे प्रकरण पुन्हा दिल्ली उच्च न्यायालयात घेतलं जाईल, असं कोर्टाने म्हटलं आहे. कोर्ट आंदोलनाला मनाई करणार की काही अटी-शर्ती घालून आंदोलन करण्यास सांगणार, याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, अभिजीत दीपके यांनी आपल्या समर्थकांना आवाहन केलं आहे की, ज्यांना दिल्लीला यायला जमणार नाही, त्यांनी आपल्या शहरांमध्ये तिरंगा मार्च सुरू करावा.

Related Posts

मराठवाड्याचा दुष्काळ संपवणार! जपानकडून वॉटर ग्रीडला २० हजार कोटींचा निधी, सहा धरणे जोडणार

मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी जायका (JICA) कडून २० हजार कोटी रुपयांच्या कर्जाला सकारात्मक प्रतिसाद; छत्रपती संभाजीनगर,…

ByByrushikesh Nov 7, 2026

नंदुरबार सामूहिक बलात्कार प्रकरण: पुराव्यांच्या त्रुटींमुळे मुंबई उच्च न्यायालयाकडून सर्व आरोपी निर्दोष मुक्त

पीडितेच्या साक्षीतील विसंगती, वैद्यकीय अहवालातील त्रुटी आणि डीएनए पुराव्याची अखंडता सिद्ध न झाल्याने न्यायालयाने खालच्या न्यायालयाचा निर्णय रद्द…

ByByrushikesh Nov 7, 2026

३० लाख द्या अन् दोन मुलांना नोकरी लावा, नाहीतर जेसीबी जाळू”; पोलिसांसमोरच धमकी, कंपनीच्या सुरक्षारक्षकासह आई-वडिलांवर गुन्हा

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात अवादा एनर्जीच्या पवनचक्की प्रकल्पाचे काम अडवून ३० लाख रुपयांची खंडणी आणि दोन मुलांना नोकरीची…

ByByrushikesh Nov 6, 2026

शेतकऱ्यांना पहिली उचल ३,९०० रुपये, किणी येथील ऊसदर आंदोलन मागे;

कोल्हापूर जिल्ह्यातील किणी टोलनाक्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ६१ तास चाललेले चक्काजाम अखेर मागे; कारखानदारांनी पहिली उचल ३,९०० रुपये,…

ByByrushikesh Nov 6, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top