• Home
  • NATIONAL
  • ना उंच मूर्ती, ना भव्य देखावा; तरीही ऐरोलीचा ‘बोलका बाप्पा’ पाहण्यासाठी गर्दी का? नेमकं काय आहे खास?
Image

ना उंच मूर्ती, ना भव्य देखावा; तरीही ऐरोलीचा ‘बोलका बाप्पा’ पाहण्यासाठी गर्दी का? नेमकं काय आहे खास?

नवी मुंबईतील ऐरोली येथे साकारलेल्या या घरगुती गणेशमूर्तीचा चेहरा आणि बारकावे इतके जिवंत आहेत की, पाहणाऱ्यांना बाप्पा प्रत्यक्ष समोर उभे असल्याचा भास होतो. गेल्या 20 वर्षांपासून ही परंपरा जपली जात आहे.

नवी मुंबई: गणेशोत्सव म्हटला की सार्वजनिक मंडळांच्या भव्य देखाव्यांची आणि उंचच उंच मूर्तींची चर्चा होते. पण नवी मुंबईतील ऐरोली येथे एक घरगुती गणपती सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. या मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी लोक अगदी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी लागतात तशा लांबच लांब रांगा लावत आहेत. कारण या मूर्तीचा चेहरा आणि बारकावे इतके जिवंत आहेत की, बाप्पा खरोखरच डोळ्यांसमोर उभे असल्याचा भास होतो.

मूर्तीमध्ये नेमकं वेगळं काय?

या गणेशमूर्तीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे बाप्पाचा चेहरा. मूर्तिकारानं चेहऱ्यावरील प्रत्येक बारकावा आणि सोंडेची ठेवण इतक्या अचूकपणे साकारली आहे की, पाहणारा क्षणभर थक्क होतो. बाप्पाची शांत, निवांत मुद्रा, लाल वस्त्र, पिवळं धोतर आणि नैसर्गिक सजावट यामुळे मूर्तीला एक वेगळाच सौंदर्यपूर्ण स्पर्श मिळतो. ही मूर्ती पाहून अनेकांना ‘साक्षात गणराय’ अवतरल्याची भावना होत आहे.

मूर्तिकार कोण?

भांडुपचे प्रसिद्ध मूर्तिकार प्रफुल कदम यांनी ही आकर्षक मूर्ती साकारली आहे. गेल्या 20 वर्षांपासून ही ‘बोलका बाप्पा’ची परंपरा जपली जात असून, यंदाही गणेशभक्तांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.

डेकोरेशन कोणी केलं?

हा व्हायरल बाप्पा चौधरी कुटुंबाचा असून स्वप्निल चौधरी, निखील चौधरी आणि प्रिया चौधरी यांनी हे डेकोरेशन केले आहे.

लोकांची प्रचंड गर्दी का?

सार्वजनिक गणपतींच्या दर्शनासाठी लोक गर्दी करतात, कारण त्यांना भव्य सजावट, देखावे किंवा उंच मूर्ती पाहायच्या असतात. पण हा घरगुती गणपती आहे. तरीदेखील, जणू एखाद्या सार्वजनिक मंडळाच्या गणपतीच्या दर्शनासाठी गर्दी व्हावी, तशी गर्दी या मूर्तीच्या दर्शनासाठी होताना दिसत आहे. या व्हायरल व्हिडीओंना लाखो व्ह्यूज मिळाले असून, हजारो नेटकऱ्यांनी या मूर्तीचं कौतुक केलं आहे.

पुणे, पनवेलसह विविध भागांतून भक्त ऐरोलीत दाखल

बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी तसेच आकर्षक देखावा पाहण्यासाठी पुणे, पनवेलसह विविध भागांतून गणेशभक्त ऐरोलीत दाखल होत आहेत. ऐरोलीत यंदा ‘बोलका बाप्पा’ची स्थापना करण्यात आली असून, गेल्या 20 वर्षांपासून ही परंपरा कायम आहे.

Related Posts

LPG e-KYC: एजन्सी पैसे मागतेय? एक पैसाही देऊ नका; 30 सप्टेंबरपर्यंत हे काम कराच

आधार आधारित बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन (BAA) 30 सप्टेंबर 2026 पर्यंत पूर्ण करणे अनिवार्य; 1 ऑक्टोबरपासून सबसिडीयुक्त सिलिंडरसाठी आधार ऑथेंटिकेशन…

ByByrushikesh Sep 24, 2026

मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय! लाऊडस्पीकर वाजवायचा असेल तर मंडळांना जमा करावे लागणार 1 लाख रुपये

मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! लाऊडस्पीकर वापरण्यासाठी मंडळांना 1 लाख रुपयांची अनामत रक्कम भरावी लागणार मुंबई: गणेशोत्सवासह सर्व…

ByByrushikesh Sep 24, 2026

रविवारीही बँका सुरू, ३ दिवसांच्या देशव्यापी बँक संपापूर्वी सरकारचा मास्टरस्ट्रोक.

बँक कर्मचारी संघटनांनी २८ ते ३० सप्टेंबर २०२६ दरम्यान तीन दिवसांच्या देशव्यापी संपाची हाक दिल्यानंतर, ग्राहकांना दिलासा देण्यासाठी…

ByByrushikesh Sep 24, 2026

‘नो युपीआय डे’: 2 ऑक्टोबरला क्यूआर कोड काळ्या कापडाने झाकणार; महाराष्ट्रासह देशभरातील 500 हून अधिक व्यापारी संघटना आंदोलनात

एमडीआर शुल्काच्या विरोधात देशभरातील व्यापारी संघटनांचे आंदोलन; गांधी जयंतीला क्यूआर कोड काळ्या कापडाने झाकून ‘गांधीगिरी’चा मार्ग मुंबई: युपीआय…

ByByrushikesh Sep 24, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top