• Home
  • Agriculture
  • Maharashtra Weather Update: मान्सूनचा मुक्काम लांबणार; राज्यात पुढील ५ दिवसांत वादळी पावसाचा इशारा
Image

Maharashtra Weather Update: मान्सूनचा मुक्काम लांबणार; राज्यात पुढील ५ दिवसांत वादळी पावसाचा इशारा

सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यातही मान्सूनच्या परतीचे संकेत नाहीत. IMD च्या अंदाजानुसार, महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये आजपासून पुढील काही दिवस वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?


सप्टेंबरचा दुसरा आठवडा सुरू होऊनही देशात मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू होण्याचे कोणतेही संकेत मिळालेले नाहीत. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये पुढील दोन दिवस वादळी वारे आणि मेघगर्जनेसह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सर्वसाधारणपणे १७ सप्टेंबरपर्यंत मान्सून माघार घेतो, मात्र यंदा बदलत्या हवामानामुळे त्याचा मुक्काम अधिक काळ लांबण्याचे स्पष्ट संकेत आहेत.

महाराष्ट्रातील हवामान बदलाचा अंदाज
गेल्या आठवड्यात देशातील अनेक भागांत पावसाने काहीशी उघडीप दिली होती. मात्र, ही स्थिती आजपासून (११ सप्टेंबर) बदलण्याची शक्यता आहे. १२ आणि १३ सप्टेंबर रोजी देशाच्या विविध भागांत पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. त्यानंतर १४ सप्टेंबरला पाऊस पुन्हा काही काळ विश्रांती घेईल आणि १५ सप्टेंबरपासून त्याचा जोर पुन्हा वाढू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

उत्तर भारतात अतिवृष्टीचा इशारा
उत्तर प्रदेश आणि बिहारमधील काही भागात मुसळधार पावसासह वीज पडण्याचा धोका व्यक्त करण्यात आला असून, मध्य प्रदेशसाठी अतिवृष्टीचा इशारा जारी करण्यात आला आहे.

महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज

मुंबई वेधशाळेने पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज जाहीर केला असून, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता वर्तवली आहे. तर काही जिल्ह्यांना पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

११ सप्टेंबर रोजीचा अलर्ट:
नाशिक घाट, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.

१२ सप्टेंबर रोजीचा अलर्ट:
धुळे, नाशिक घाट, नाशिक, पालघर, ठाणे, मुंबई, मुंबई उपनगर, रायगड, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा, जालना, बीड, धाराशिव, सोलापूर, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस व विजांची शक्यता आहे.

१३ सप्टेंबर रोजीचा अलर्ट:
पालघर, ठाणे, मुंबई, मुंबई उपनगर, रायगड, पुणे घाट, पुणे, सातारा घाट, सातारा, रत्नागिरी, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा, जालना, बीड, धाराशिव, परभणी, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.

१४ सप्टेंबर रोजीचा अलर्ट:
नाशिक घाट, पुणे घाट, पुणे, अहिल्यानगर आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

नागरिकांसाठी सूचना
यलो अलर्ट असलेल्या जिल्ह्यांमध्ये नागरिकांनी विजांचा कडकडाट होण्याची शक्यता लक्षात घेऊन काळजी घ्यावी. उघड्यावर न राहण्याचा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.

Related Posts

LPG e-KYC: एजन्सी पैसे मागतेय? एक पैसाही देऊ नका; 30 सप्टेंबरपर्यंत हे काम कराच

आधार आधारित बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन (BAA) 30 सप्टेंबर 2026 पर्यंत पूर्ण करणे अनिवार्य; 1 ऑक्टोबरपासून सबसिडीयुक्त सिलिंडरसाठी आधार ऑथेंटिकेशन…

ByByrushikesh Sep 24, 2026

मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय! लाऊडस्पीकर वाजवायचा असेल तर मंडळांना जमा करावे लागणार 1 लाख रुपये

मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! लाऊडस्पीकर वापरण्यासाठी मंडळांना 1 लाख रुपयांची अनामत रक्कम भरावी लागणार मुंबई: गणेशोत्सवासह सर्व…

ByByrushikesh Sep 24, 2026

रविवारीही बँका सुरू, ३ दिवसांच्या देशव्यापी बँक संपापूर्वी सरकारचा मास्टरस्ट्रोक.

बँक कर्मचारी संघटनांनी २८ ते ३० सप्टेंबर २०२६ दरम्यान तीन दिवसांच्या देशव्यापी संपाची हाक दिल्यानंतर, ग्राहकांना दिलासा देण्यासाठी…

ByByrushikesh Sep 24, 2026

‘नो युपीआय डे’: 2 ऑक्टोबरला क्यूआर कोड काळ्या कापडाने झाकणार; महाराष्ट्रासह देशभरातील 500 हून अधिक व्यापारी संघटना आंदोलनात

एमडीआर शुल्काच्या विरोधात देशभरातील व्यापारी संघटनांचे आंदोलन; गांधी जयंतीला क्यूआर कोड काळ्या कापडाने झाकून ‘गांधीगिरी’चा मार्ग मुंबई: युपीआय…

ByByrushikesh Sep 24, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top