• Home
  • Breaking News
  • छत्रपती संभाजीनगर: पिझ्झा हट आणि शेळके मामा ढाब्यावर कारवाई; परवाने रद्द!
Image

छत्रपती संभाजीनगर: पिझ्झा हट आणि शेळके मामा ढाब्यावर कारवाई; परवाने रद्द!

अन्न सुरक्षा विभागाचा मोठा छापा! छत्रपती संभाजीनगरमधील पिझ्झा हट आणि शेळके मामा ढाब्याला सील केले आहे. अस्वच्छता आणि नियमांचे उल्लंघन केल्याने परवाने रद्द करण्यात आले आहेत.

छत्रपती संभाजीनगर: शहरातील खाद्यप्रेमींसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाने (FDA) शहरातील दोन नामांकित आस्थापनांवर मोठी कारवाई केली आहे. बजाजनगर येथील ‘पिझ्झा हट’ आणि शरणापूर भागातील ‘शेळके मामा ढाबा’ यांना ग्राहकांच्या आरोग्याशी खेळल्याप्रकरणी सील करण्यात आले आहे. अन्न सुरक्षा अधिकारी प्र. श. कुचेकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या कारवाईत दोन्ही ठिकाणी भेसळ आणि अस्वच्छतेचे गंभीर प्रकार उघडकीस आले आहेत.

शेळके मामा ढाबा: पूर्वीच्या नोटिसेनंतरही सुधारणा नाही

शरणापूर भागातील ‘शेळके मामा ढाबा’ येथे अन्न सुरक्षा अधिकारी कुचेकर यांनी यापूर्वीच तपासणी करून आढळलेल्या त्रुटी दूर करण्याबाबत नोटीस बजावली होती. मात्र, आस्थापनेच्या मालकांनी नोटीस डावलून ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ सुरू ठेवला. अखेर झालेल्या छाप्यात स्वयंपाकघराची अवस्था अत्यंत किळसवाणी आढळून आली.

एफडीएने आढळलेल्या गंभीर त्रुटी:

  • स्वच्छतेचा भंग: स्वयंपाकघरात प्रचंड घाण आणि आरोग्यास धोकादायक परिस्थिती होती.
  • किटकांचा सुळसुळाट: झुरळे आणि इतर किटकांचा वावर होता, तसेच खिडक्यांना किटकरोधक जाळ्या बसवलेल्या नव्हत्या.
  • पाणी साचणे: स्वयंपाकघरात पाणी साचलेले होते आणि ड्रेनेज व्यवस्था अत्यंत निकृष्ट होती.
  • अन्न विलगीकरण नाही: शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांसाठी स्वतंत्र व्यवस्था नव्हती.
  • कर्मचाऱ्यांची हलगर्जी: अन्न हाताळणारे कर्मचारी हातमोजे, शिरोवस्त्र आणि शू-कव्हरचा वापर करत नव्हते.
  • चाचणी नोंदी नाहीत: खाद्यपदार्थांच्या मान्यताप्राप्त प्रयोगशाळेतील चाचण्यांच्या नोंदी उपलब्ध नव्हत्या.

या गंभीर त्रुटींमुळे ढाब्याचा परवाना रद्द करून आस्थापनेला सील करण्यात आले आहे.

पिझ्झा हटची मुजोरी: बोर्डावर काही, प्रत्यक्षात काही!

बजाजनगर येथील ‘पिझ्झा हट’ (मे. सॅफायर फूड्स इंडिया लिमिटेड) यांनाही यापूर्वी त्रुटी सुधारण्यासाठी नोटीस देण्यात आली होती. मात्र, त्यांनीही दुर्लक्ष केल्याने अखेर छापा मारून त्यांची मस्ती उतरवण्यात आली. या आस्थापनेतही अन्न सुरक्षेचे गंभीर उल्लंघन आढळून आले.

पिझ्झा हटमधील मुख्य त्रुटी:

  • तेलाची गुणवत्ता तपासली नाही: अन्न तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तेलाची गुणवत्ता तपासली जात नव्हती आणि कळकटलेल्या तेलात पुन्हा पुन्हा पदार्थ तळले जात होते.
  • अस्वच्छता: आस्थापनेत घाणेरडेपणा आणि किटकांचा वावर आढळून आला.
  • चाचणी नोंदींचा अभाव: खाद्यपदार्थांच्या चाचण्या मान्यताप्राप्त प्रयोगशाळेमार्फत केल्याच्या कोणत्याही नोंदी आढळल्या नाहीत.
  • फसवणूक: सर्व पदार्थ ‘व्हेजिटेबल सोयाबीन तेलात’ तयार केले जातात, असा बोर्ड लावला असताना प्रत्यक्षात ‘मिक्स व्हेजिटेबल फॅट’ आणि ‘राईस ब्रान तेलाचा’ वापर केला जात होता.
  • एकच ओव्हन: शाकाहारी आणि मांसाहारी अन्नपदार्थ तयार करण्यासाठी एकच ओव्हन वापरला जायचा.

या सर्व कारणांमुळे पिझ्झा हटचाही परवाना रद्द करून आस्थापनेला सील करण्यात आले आहे.

ग्राहकांच्या आरोग्याला धोका पत्करून चालणार नाही – एफडीए

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या या कारवाईमुळे शहरातील इतर हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सना इशारा मिळाला आहे. ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या कोणत्याही आस्थापनेला सोडले जाणार नाही, असा संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे. अन्न सुरक्षा नियमांचे पालन करणे बंधनकारक असून, भविष्यात अशाच प्रकारच्या कारवाया सुरू राहतील, असे विभागाकडून सांगण्यात आले आहे.

Related Posts

नंदुरबार सामूहिक बलात्कार प्रकरण: पुराव्यांच्या त्रुटींमुळे मुंबई उच्च न्यायालयाकडून सर्व आरोपी निर्दोष मुक्त

पीडितेच्या साक्षीतील विसंगती, वैद्यकीय अहवालातील त्रुटी आणि डीएनए पुराव्याची अखंडता सिद्ध न झाल्याने न्यायालयाने खालच्या न्यायालयाचा निर्णय रद्द…

ByByrushikesh Nov 7, 2026

व्हिडिओकॉनचं २० हजार कोटींचं साम्राज्य कोसळलं; वेणुगोपाल धूत अधिकृतपणे दिवाळखोर घोषित

छ. संभाजीनगर : एकेकाळी भारतीय मध्यमवर्गीय कुटुंबांच्या स्वप्नांचा भाग असलेला आणि ‘प्रत्येक घराची पसंती’ म्हणून ओळखला जाणारा व्हिडिओकॉन…

ByByrushikesh Nov 6, 2026

नाथसागरात ७०% पाणीसाठा, तरीही विदेशी पक्षी आले नाही ?

नाथसागरात ७० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा असूनही स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन उशिराने; अल निनोसह सांडपाणी, रासायनिक खते आणि मासेमारीमुळे पक्ष्यांच्या…

ByByrushikesh Nov 5, 2026

थंडीचं कनेक्शन तुटलं! उत्तरेकडून कोरडे वारे सुरू, पण मराठवाड्यात थंडी कधी?

मराठवाड्यात थंडीची प्रतीक्षा लांबणार. उत्तरेकडून कोरडे वारे सुरू; ९ नोव्हेंबरनंतर तापमान घटणार, पण एल निनोमुळे डिसेंबरपर्यंत थंडीचा जोर…

ByByrushikesh Nov 5, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top