नैसर्गिक शेती म्हणजे काय? नैसर्गिक शेतीचे फायदे, पद्धती, कमी खर्च, अधिक नफा, मातीची सुपिकता आणि सरकारी योजनांची संपूर्ण माहिती जाणून घ्या
नैसर्गिक शेती म्हणजे काय?
शेतकरी आपल्या शेता मध्य अधिक उत्पन्ना साथी रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा अती वापर करतात. अती वापर केले मुल्य शेतीचा खर्च वाढतो. रासायनिक खाताच्या वापरामुळे जमीनिची सुपीकता कमी होते, आणिउत्पन्न मोठ्या प्रमाणात घटत आहे. नैसर्गिक शेतीमध्ये रासायनिक खते आणि कीटकनाशकाऐवजी नैसर्गिक खतांचा वापर केला जातो.
त्यामध्ये शेणखत, गोमूत्र, जीवामृत, बीजामृत आणि नैसर्गिक सूक्ष्मजीवांचा वापर करून ही शेती केली जाते. त्यामुळे कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न मिळवता येते आणि जमिनीची गुणवत्ता सुद्धा टिकून राहते.
नैसर्गिक शेतीचे मुख्य फायदे.
शेतीचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होतो.
नैसर्गिक शेतीमध्ये रासायनिक खते, कीटकनाशके आणि महागडी औषधे खरेदी करण्याची गरज पडत नाही. त्यामुळे हजारो रुपयांची बचत होते.
जमिनीची सुपीकता वाढते.
शेतात रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय खतांचा वापर वाढवल्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते.
उत्पादनाची गुणवत्ता सुधारते.
नैसर्गिक शेतीमधून घेतलेले पीक हे आरोग्यासाठी उत्तम असते.
पाण्याची बचत होते.
नैसर्गिक शेतीमध्ये मलचिंग ही पद्धत वापरल्यामुळे जमिनीत ओलावा जास्त काळ टिकतो, आणि शेतीतून कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पन्न मिळवता येते.
अधिक नफा मिळण्याची संधी निर्माण होते.
आजकाल शहरात आरोग्याची विशेष काळजी घेतली जाते. त्यामुळं नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला भाजीपाल्याला बाजारात चांगली मागणी आहे, आणि त्याला दरसुधा चांगला मिळतो.
पर्यावरणाचे संरक्षण होते.
नैसर्गिक शेती पद्धतीमुळे जमिनीचे प्रदूषण कमी होते, आणि त्यामुळे पर्यावरणाचे संरक्षण होते.
जमिनीतील उपयुक्त जीवाणू वाढतात.
नैसर्गिक शेतीमध्ये मातीतील सूक्ष्म जीवांना, गांडूळ यांना खूप महत्त्व असते. रासायनिक खताचा वापर न झाल्यामुळे त्या जीवाणूंची संख्या वाढते, आणि त्याचा फायदा थेट पिकाच्या वाढीला होतो.
केंद्र सरकारचा लाभ
नैसर्गिक शेतीला चालना मिळावी म्हणून केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत आहेत.त्यासाठी प्रशिक्षण शिबीर, अनुदान आणि विविध योजना राबवत आहेत. शेतकऱ्यांनी स्थानिक कृषी विभागाशी संपर्क साधून उपलब्ध योजनांची माहिती करून घ्यावी.
नैसर्गिक शेती बाबत तज्ञ काय म्हणतात?
कृषी तज्ञांच्या मते, नैसर्गिक शेतीला सुरुवात केल्यानंतर काही हंगामात थोडे उत्पन्न कमी येऊ शकते. मात्र, एकदा जमिनीची सुपीकता वाढली की उत्पादन वाढून ते स्थिर होते. तसेच, पुढच्या काही वर्षांसाठीचा शेतीवरचा खर्च खूप कमी होतो. यामुळे दीर्घकालीन नफा वाढण्यास सुरुवात होते.

















