• Home
  • Agriculture
  • पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना २०२६ : ५ जुलै पासून वितरण सुरु.
Image

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना २०२६ : ५ जुलै पासून वितरण सुरु.

कर्ज माफी योजनेच्या पात्रता आणि अटी..

मुंबई – महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारची ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ ५ जुलै २०२६ पासून सुरु होत आहे. यात सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना ३६,५८५ कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. ५ जुलैपासून पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीचे पैसे जमा होण्यास सुरुवात होईल.

कर्जमाफीच्या अटी व पात्रता काय आहेत ?

१. संपूर्ण कर्जमाफी: १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत घेतलेली आणि ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेली, तसेच ३१ मार्च २०२६ पर्यंत न फेडलेली २ लाख रुपयांपर्यंतची पीक कर्जे पूर्णपणे माफ केली जातील.

२. सेटलमेंट (OTS): २ लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपेक्षा जास्तची रक्कम एकाच हप्त्यात भरावी लागेल, त्यानंतर उर्वरित २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले जाईल.

३. प्रोत्साहन अनुदान: नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५०,००० रुपयांचे प्रोत्साहन अनुदान दिले जाईल.

२०१९ योजनेतील लाभार्थींसाठी विशेष अट: ज्या शेतकऱ्यांनी २०१९ च्या ‘महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने’चा लाभ घेतला आहे, त्यांना या योजनेत केवळ ५०,००० रुपयांपर्यंतच कर्जमाफी मिळेल.

कोणाकोणाला लाभ मिळणार नाही ?

या योजनेतून दरमहा २५,००० रुपयांपेक्षा जास्त पगार असलेल्या नोकरदार व्यक्ती, आयकरदाते, सरकारी कर्मचारी, निवडून आलेले प्रतिनिधी आणि दरमहा २५,००० रुपयांपेक्षा जास्त पेन्शन घेणाऱ्या निवृत्त व्यक्ती यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

विरोधी पक्षाची या योजनेवर आणि पात्रता अटीवर टीका

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दावा केला की, ५० टक्क्यांहून अधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार) आमदार रोहित पवार यांनी ही योजना सुमारे ७० टक्के शेतकऱ्यांवर अन्याय करत आहे असा आरोप केला. काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी या योजनेला जनतेच्या ‘डोळ्यात धूळ फेकणारी’ घोषणा आहे असे म्हणत सरकारकडे उर्वरित १६,००० कोटी रुपयांचा निधी कुठून आणणार ? असा प्रश्न उपस्थित केला.

सरकारचे स्पष्टीकरण

कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना सांगितले की, “आम्ही स्वतः शेतकऱ्यांची लेकरे आहोत आणि त्यांच्या कल्याणाबाबत तितकेच चिंतित आहोत”. तसेच, कोणत्याही पात्र शेतकऱ्याला Agristack Farmer ID नसल्यामुळे वंचित ठेवले जाणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना २०२६ या योजनेतून लाखो शेतकऱ्यांना कर्जातून दिलासा मिळणार आहे. ५ जुलैपासून या योजनेचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांना मिळण्यास सुरुवात होईल, त्यामुळे राज्यातील शेतकरी या योजनेकडे उत्सुकतेने पाहत आहे.

Related Posts

LPG e-KYC: एजन्सी पैसे मागतेय? एक पैसाही देऊ नका; 30 सप्टेंबरपर्यंत हे काम कराच

आधार आधारित बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन (BAA) 30 सप्टेंबर 2026 पर्यंत पूर्ण करणे अनिवार्य; 1 ऑक्टोबरपासून सबसिडीयुक्त सिलिंडरसाठी आधार ऑथेंटिकेशन…

ByByrushikesh Sep 24, 2026

मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय! लाऊडस्पीकर वाजवायचा असेल तर मंडळांना जमा करावे लागणार 1 लाख रुपये

मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! लाऊडस्पीकर वापरण्यासाठी मंडळांना 1 लाख रुपयांची अनामत रक्कम भरावी लागणार मुंबई: गणेशोत्सवासह सर्व…

ByByrushikesh Sep 24, 2026

रविवारीही बँका सुरू, ३ दिवसांच्या देशव्यापी बँक संपापूर्वी सरकारचा मास्टरस्ट्रोक.

बँक कर्मचारी संघटनांनी २८ ते ३० सप्टेंबर २०२६ दरम्यान तीन दिवसांच्या देशव्यापी संपाची हाक दिल्यानंतर, ग्राहकांना दिलासा देण्यासाठी…

ByByrushikesh Sep 24, 2026

‘नो युपीआय डे’: 2 ऑक्टोबरला क्यूआर कोड काळ्या कापडाने झाकणार; महाराष्ट्रासह देशभरातील 500 हून अधिक व्यापारी संघटना आंदोलनात

एमडीआर शुल्काच्या विरोधात देशभरातील व्यापारी संघटनांचे आंदोलन; गांधी जयंतीला क्यूआर कोड काळ्या कापडाने झाकून ‘गांधीगिरी’चा मार्ग मुंबई: युपीआय…

ByByrushikesh Sep 24, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top