• Home
  • Breaking News
  • अभिजीत दीपके यांच्यावर हल्ल्याचा गंभीर आरोप; इन्फ्लुएंसर फैजान अन्सारी यांची पोलीस तक्रार
Image

अभिजीत दीपके यांच्यावर हल्ल्याचा गंभीर आरोप; इन्फ्लुएंसर फैजान अन्सारी यांची पोलीस तक्रार

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांच्या विरोधात सोशल मीडिया इन्फ्लुएंसर फैजान अन्सारी यांनी दिल्ली पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पुणे व छत्रपती संभाजीनगरमध्ये हल्ल्याचे आरोप, त्वरित अटकेची मागणी.

कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे संस्थापक अभिजीत दीपके यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. सोशल मीडिया इन्फ्लुएंसर फैजान अन्सारी यांनी दीपके यांच्या विरोधात दिल्ली पोलिसात लेखी तक्रार दाखल केली आहे. अन्सारी यांनी दीपके यांच्या सहकाऱ्यांकडून आपल्यावर हल्ला झाल्याचा आरोप केला आहे, तसेच CJP प्रमुखांची त्वरित अटक करण्याची मागणी केली आहे.

‘माझ्यावर पुणे आणि छ.संभाजीनगर मध्ये हल्ला’

फैजान अन्सारी यांनी पत्रकारांना सांगितले की, “मी आज अभिजीत दीपके यांच्या विरोधात दिल्लीचे डीसीपी यांना लेखी तक्रार दिली आहे. कारण त्यांच्या लोकांनी माझ्यावर हल्ला केला आणि त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. माझ्यावर पुणे आणि औरंगाबादमध्ये हल्ला झाला होता. या प्रकरणी आधीच दोन गुन्हे दाखल आहेत”.

अन्सारी यांनी पुढे सांगितले की, “माझी मागणी आहे की दिल्ली पोलिसांनी अभिजीत दीपके यांना त्वरित अटक करावी”. तसेच त्यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री आणि पोलीस प्रशासनाचे कौतुक केले. “सोनम वांगचुक यांना योग्य वेळी ताब्यात घेतल्याने दिल्लीचे वातावरण बिघडण्यापासून वाचले, याबद्दल मी दिल्लीच्या मुख्यमंत्री आणि पोलिसांना सलाम करतो”, असे ते म्हणाले. अन्सारी यांनी दीपके यांच्यावर स्वत:च्या वैयक्तिक फायद्यासाठी हे सर्व करत असल्याचा आरोपही केला.

आरटीआय कार्यकर्त्याकडून वडिलांच्या संपत्तीची चौकशी मागणी

दरम्यान, आरटीआय कार्यकर्ते अमित तिवारी यांनी अभिजीत दीपके यांचे वडील भगवानराव दीपके यांच्या आर्थिक व्यवहारांची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. तिवारी यांच्या मते, भगवानराव दीपके हे महाराष्ट्र सरकारचे सेवानिवृत्त कर्मचारी असून ते ज्युनियर इंजिनियर होते. त्यांचा पगार ६० ते ६५ हजार रुपये होता. “एका ज्युनियर इंजिनियरच्या पगारात अमेरिकेत मुलाच्या उच्च शिक्षणाचा खर्च कसा परवडला?” असा सवाल तिवारी यांनी उपस्थित केला आहे.

तिवारी यांनी या प्रकरणी महाराष्ट्र सरकार, भारतीय निवडणूक आयोग आणि केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमा शुल्क मंडळ (CBIC) या तीन ठिकाणी तक्रार दाखल केली आहे. त्यांनी CJP च्या कायदेशीर स्थितीबाबतही निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे, कारण ही संस्था नोंदणीकृत नसतानाही राजकीय पक्षाप्रमाणे निधी स्वीकारत असल्याचा त्यांचा दावा आहे.

कपिल सिब्बल यांच्या एक कोटी निधीवर प्रश्न

आरटीआय कार्यकर्ते अमित तिवारी यांनी राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी CJP साठी जाहीर केलेल्या एक कोटी रुपयांच्या कायदेशीर मदत निधीवरही प्रश्न उपस्थित केला आहे. या निधीवर १८ टक्के जीएसटी लावण्याची मागणी त्यांनी केली आहे.

दीपके यांचे विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला नुकसान भरपाईचे आवाहन

दुसरीकडे, अभिजीत दीपके यांनी परीक्षा घोटाळ्यांमुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खुले पत्र लिहून ही मागणी केली असून, सरकारने आतापर्यंत ही भरपाई न दिल्याबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत.

या सर्व घडामोडींमुळे CJP संस्थापक अभिजीत दीपके यांचे आर्थिक व्यवहार, संस्थेची कायदेशीर स्थिती आणि त्यांच्यावरील हल्ल्याचे आरोप यांबाबत गंभीर चर्चा रंगली आहे. फैजान अन्सारी यांच्या तक्रारीला पोलिसांकडून काय प्रतिसाद मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Posts

UPI वापरावर शुल्क? ग्राहकांना काय सत्य आहे? जाणून घ्या सर्व काही

UPI व्यवहारांवर शुल्क आकारले जाणार असल्याच्या अफवांमुळे ग्राहकांमध्ये संभ्रम. जाणून घ्या UPI शुल्काबाबतचे सत्य, लहान व्यापाऱ्यांवर काय परिणाम…

ByByrushikesh Aug 8, 2026

देवगाव रंगारी शाळेत धक्काबुक्कीतून चाकूहल्ला; दहावीच्या विद्यार्थ्याने चार जणांवर केले वार, एक गंभीर

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील देवगाव रंगारी येथील शाळेत किरकोळ कारणावरून दहावीच्या विद्यार्थ्याने पॉकेट चाकूने चार वर्गमित्रांवर हल्ला केला. एकाची…

ByByrushikesh Aug 8, 2026

सुनील तटकरे यांचं मोठं वक्तव्य; ‘प्रशांत किशोरांची नेमणूक झाली नाही, आम्हाला रणनीतीकारांची गरज नाही’

प्रशांत किशोर-सुनेत्रा पवार भेटीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी रणनीतीकारांची गरज नसल्याचं सांगत…

ByByrushikesh Aug 8, 2026

मतदारसंघ पुनर्रचना विधेयक : सरकारची पुन्हा एकदा संसदेत मांडण्याची तयारी, काँग्रेसचा स्पष्ट विरोध

मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा संसदेत आणण्याची केंद्र सरकारची तयारी. दोन तृतीयांश बहुमतासाठी जोरदार हालचाली. काँग्रेसने थेट नकार देत…

ByByrushikesh Aug 8, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top