Image

शिवसेना 60वा वर्धापन दिन

उद्धव ठाकरेंचे भावनिक आवाहन, शिंदें म्हणताय यह तो बस ट्रेलर है

पूर्वी शिवसेनेचा वर्धापन दिन म्हटलं कि शिवसैनिक सबंध महारास्त्रातून स्वखर्चाने मुंबईला यायचे, मुंबत मराठी माणसाचा मेळावा भरायचा…. पण आता एक वेगळेच चित्र पाहायला मिळते, शिवसेनेचा वर्धापन दिन म्हटलं कि आता प्रश्न विचारला जातो कोणत्या शिवसेनेचा शिंदे सेनेचा कि उद्धव ठाकरे गटाचा ? २०२२ मध्ये शिवसेना फुटली आणि तेव्हा पासून एकाच पक्षाचे दोन मेळावे होऊ लागले, आधी मराठी माणसाचे नेतृत्व करणाऱ्या शिवसेनेचे दोन नेते आता मुंबईच्या दोन टोकांवर एकाच दिवशी आपला वर्धापन दिन साजरा करतात, काल शिवसेनेचा साठावा वर्धापनदिन साजरा झाला…. एका बाजूला षण्मुखानंद सभागृहात उद्धव ठाकरेंनी भावनिक आवाहन होते, तर दुसऱ्या बाजूला गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये एकनाथ शिंदे गर्जत होते की हा तर फक्त ट्रेलर आहे. शिवसेनेला साठ वर्षे उलटली आणि या साठाव्या वर्धापन दिनी पक्षाच्या आयुष्यातील सर्वात मोठी लढाई लढली. आज आपण पाहणार आहोत वर्धापन दिनाच्या भाषणात काय घडलं कोण काय बोलले आणि महाराष्ट्राच्या राजकारणासाठी या भाषणांचा अर्थ काय आहे.

शिवसेनेची स्थापना बाळासाहेब ठाकरेंनी १९ जून १९६६ रोजी केली होती. त्या दिवसापासून दरवर्षी हा दिवस शिवसेनेसाठी उत्सवाचा असतो. पण यंदाचा साठावा वर्धापन दिन वेगळ्याच परिस्थितीत आला. ऑपरेशन टायगरच्या नावाने उद्धव ठाकरेंच्या पक्षातून सहा खासदार शिंदेंच्या गटाकडे जाण्याची चर्चा महिनाभरापासून सुरू होती. या सहा खासदारांनी उघडपणे ठाकरेंपासून फारकत घेतली होती. अशा वातावरणात दोन्ही गटांनी एकाच दिवशी स्वतंत्र मेळावे घेतले. शिंदेंच्या मेळाव्यात ते सहा बंडखोर खासदार व्यासपीठावर येणार असल्याच्या चर्चा आधीपासून सुरू होत्या. महाराष्ट्र या दोन मेळाव्यांकडे एका वेगळ्याच उत्सुकतेने पाहत होता.

षण्मुखानंद सभागृहात उद्धव ठाकरेंच्या मेळाव्याला कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. ठाकरेंनी भाषणाच्या सुरुवातीलाच आपल्यावर होणाऱ्या टीकेला उत्तर दिले. मी कार्यकर्त्यांना भेटत नाही, नेत्यांशी संपर्क नाही असे आरोप केले जातात, पण याच माणसांना निवडून आणण्यासाठी मी लोकसभेत प्रत्येक मतदारसंघात सहा ते दहा सभा घेतल्या होत्या. मी गर्व करत नाही कारण लोकांना उद्धव ठाकरेला नाही तर उद्धव बाळासाहेब ठाकरेला किंमत आहे, हे मला माहीत आहे असे ते म्हणाले.
त्यानंतर त्यांनी फुटीर खासदारांवर थेट हल्ला चढवला. बाळासाहेबांनी मराठी माणसाच्या रक्तात स्वाभिमान रुजवला, त्यात ही भेसळ कुठून आली, ही कोणाची अवलाद आहे, असा थेट सवाल करत त्यांनी गद्दार म्हणत गेलेल्या खाजदारावर हल्लाबोल केला. जे आज निघून गेले त्यांनी मोदींची लाट असताना सुद्धा बाळासाहेबांच्या नावावर मतदारांचा विश्वास मिळवला होता, त्या मतदारांची माफी मागतो असेही ते म्हणाले.
भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणावर बोलताना ठाकरे म्हणाले की भाजप आता कोणासमोरचे बटन दाबा तो उद्या आमच्याकडेच येणार असे म्हणायला लागला आहे. शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव मिळत नाही, पण गद्दारांचा हमीभाव मात्र ठरलेला आहे, अशा शब्दांत त्यांनी भाजपवर घणाघात केला. काँग्रेसबाबत बोलताना ते म्हणाले की काँग्रेसने कधी आमच्यावर डोळे वटारले नाहीत, आमच्या माणसांना कधी मुख्यमंत्री केले नाही, पण शिवसेना मुळासकट उखडण्याचा प्रयत्न भाजप करतो आहे. त्यामुळे काँग्रेस हा खरा मित्र आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
दुसऱ्या बाजूला गोरेगावात एकनाथ शिंदेंनी आपल्या भाषणाची सुरुवातच आव्हानाने केली. बऱ्याच जणांच्या नजरा लागल्या आहेत की व्यासपीठावर कोण येणार, पण आज टायगर तुमच्यासमोर खडा आहे, असे सांगत त्यांनी वातावरण तापवले. काही कुत्रे एकत्र येऊन भुंकत आहेत पण शेर एकटा असतो, टायगर शिकार करतो, असे म्हणत त्यांनी उद्धव गटावर निशाणा साधला.
शिंदेंनी नरेंद्र मोदींचे कौतुक करताना सांगितले की मोदींनी राम मंदिर आणि कलम ३७० हटवणे अशी बाळासाहेबांची स्वप्ने पूर्ण केली. शिवसेना आज गावागावात पोहोचली आहे, हीच बाळासाहेबांना खरी आदरांजली आहे, असे ते म्हणाले. उद्धव ठाकरेंवर टीका करताना शिंदे म्हणाले की जे हिंदुत्व विसरले ते राजकारणातून संपले. जिवंतपणी बाळासाहेबांना त्रास दिला आणि त्यांच्या निधनानंतर बाळासाहेबांनी ज्यांचा तिरस्कार केला त्यांनाच तुम्ही जवळ केले, असा थेट आरोप त्यांनी ठाकरेंवर केला.
ज्या निवडणुकीत उठावात सोबत आलेल्यांपैकी एकही निवडून न आल्यास राजकारण सोडेन असे मी म्हणालो होतो, आमचे ४० आमदार होते आणि ६० निवडून आणले, असे सांगत शिंदेंनी आपल्या यशाचे आकडे मांडले.

तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी भाषणाच्या शेवटी आपल्या कार्यकर्त्यांना एक प्रश्न विचारला, ज्याने सभागृहात शांतता पसरली आणि काही क्षणानंतर जयघोष झाला. ठाकरे म्हणाले, मी गेल्या बारा ते चौदा वर्षांपासून तुमच्या नेतृत्वाची जबाबदारी सांभाळतो आहे. आज माझ्यावर जे आरोप होत आहेत ते जर तुम्हाला खरे वाटत असतील तर मी आत्ता पक्षप्रमुख पदावरून खाली उतरायला तयार आहे. पण शिवसेना चोराच्या आणि दरोडेखोराच्या हातात जाऊ देणार नाही, ही माझी एकच अट आहे. तुमच्यापैकी एक सच्चा शिवसैनिक येऊ द्या, तो पक्षप्रमुख होईल, मी पद सोडायला तयार आहे.
हे ऐकताच सभागृहातील हजारो शिवसैनिक जागेवर उभे राहिले आणि ठाकरेंना पद सोडू नका असा जोरदार प्रतिसाद दिला.
शिंदेंच्या मेळाव्यात बंडखोर सहा खासदार व्यासपीठावर येतील अशी चर्चा आधीपासून होती. पण प्रत्यक्षात तसे काहीही घडले नाही. ते खासदार मेळाव्याला हजर राहिले नाहीत. त्यामुळे ऑपरेशन टायगरचा पुढचा टप्पा अजूनही बाकी असल्याचे दिसते. शिंदेंनी हा फक्त ट्रेलर आहे असे म्हणत पुढे मोठ्या हालचालींचे संकेत दिले, पण कधी ते मात्र सांगितले नाही.
उद्धव ठाकरेंच्या बाजूने पाहिल्यास त्यांनी या मेळाव्यात कार्यकर्त्यांमध्ये इमोशनल वातावरण निर्माण करण्यात यश मिळवले. परंतु सहा खासदारांची बंडखोरी अजूनही कायम आहे आणि त्यांचे राजकीय भवितव्य अनिश्चित आहे. महायुतीमध्ये शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील संवाद चांगला असल्याचे शिंदेंनी जाहीरपणे सांगितले. महाराष्ट्राच्या राजकारणातील ही उलथापालथ पुढेही सुरूच राहणार असल्याचे चित्र आहे.

साठ वर्षांपूर्वी बाळासाहेबांनी मराठी माणसाच्या मनात शिवसेना हा एक विचार रुजवला होता. तो विचार आज दोन नेते दोन वेगळ्या दिशांनी घेऊन जात आहे. एक म्हणतो मी हिंदुत्वाचा खरा वारसदार आहे, दुसरा म्हणतो माझ्यावरचा विश्वास तुम्हीच सांगा. पण बाळासाहेब ज्या सामान्य मराठी माणसासाठी उभे राहिले त्याला नक्की कोण हवे आहे, हे ठरवण्याचा अधिकार शेवटी त्याचाच आहे. ऑपरेशन टायगर पूर्ण होईल किंवा नाही, शिवसेना एकत्र येईल किंवा नाही, पण महाराष्ट्राचे राजकारण पुढील काही महिने शांत राहणार नाही हे मात्र नक्की आहे.
तुम्हाला काय वाटते नेमकी खरी शिवसेना कोणती ? तुमचे मत कॉमेंट मध्ये नक्की लिहा व्हिडीओला लाईक करा chanel ला subscribe करा आणि बेल icon दाबायला विसरू नका.

Related Posts

मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय! लाऊडस्पीकर वाजवायचा असेल तर मंडळांना जमा करावे लागणार 1 लाख रुपये

मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! लाऊडस्पीकर वापरण्यासाठी मंडळांना 1 लाख रुपयांची अनामत रक्कम भरावी लागणार मुंबई: गणेशोत्सवासह सर्व…

ByByrushikesh Sep 24, 2026

रविवारीही बँका सुरू, ३ दिवसांच्या देशव्यापी बँक संपापूर्वी सरकारचा मास्टरस्ट्रोक.

बँक कर्मचारी संघटनांनी २८ ते ३० सप्टेंबर २०२६ दरम्यान तीन दिवसांच्या देशव्यापी संपाची हाक दिल्यानंतर, ग्राहकांना दिलासा देण्यासाठी…

ByByrushikesh Sep 24, 2026

‘नो युपीआय डे’: 2 ऑक्टोबरला क्यूआर कोड काळ्या कापडाने झाकणार; महाराष्ट्रासह देशभरातील 500 हून अधिक व्यापारी संघटना आंदोलनात

एमडीआर शुल्काच्या विरोधात देशभरातील व्यापारी संघटनांचे आंदोलन; गांधी जयंतीला क्यूआर कोड काळ्या कापडाने झाकून ‘गांधीगिरी’चा मार्ग मुंबई: युपीआय…

ByByrushikesh Sep 24, 2026

धाराशिवमध्ये पवन ऊर्जा प्रकल्पांना चोरीचा मोठा फटका; ८ महिन्यांत २० कोटींचे साहित्य चोरीस, प्रकल्प वर्षभर लांबणीवर

धाराशिवमधील पवन ऊर्जा प्रकल्पांमध्ये ८ महिन्यांत २० कोटींचे साहित्य चोरीस गेल्याने प्रकल्प एक वर्ष लांबले. चोरी आणि तोडफोडीमुळे…

ByByrushikesh Sep 24, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top