• Home
  • Agriculture
  • मराठवाड्यात पावसाच्या खंडामुळे कपाशीच्या रोपांना मुळकुजचा धोका..काय आहेत लक्षणे आणि उपाय?
Image

मराठवाड्यात पावसाच्या खंडामुळे कपाशीच्या रोपांना मुळकुजचा धोका..काय आहेत लक्षणे आणि उपाय?

मराठवड्यात सध्या पावसाचा खंड पडला आहे. सगळीकडे कपाशी उगवून आली असून त्यावर आता मूळकुज रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढली आहे. लक्षणे दिसताच लगेच उपाय योजना कराव्यात.

काय आहे मूळकुझ ?

पावसाळ्यात अचानक पावसाचा खंड पडला तर वातावरण अचानक उष्ण आणि कोरडे होते. त्या मुळे बुर्शी वेगाने वाढते. यामुळे कपाशीचे मुळे कुजू लागतात.

मूळकुझचे लक्षण काय आहेत?

वाशीच्या रोपाचा जमिनीलगतचा बुंधा कुजल्यामुळे, रोपे शेंड्याकडून कोमेजू लागतात आणि खाली झुकतात. कपाशीच्या बुंध्याजवळ बुरशीमुळे पांढऱ्या रंगाची बुरशी दिसते. त्या ठिकाणी मोहरीच्या दाण्यासारखे तपकिरी बुरशीचे कण तयार होतात. या रोगाचा प्रादुर्भाव पेरणीनंतर पंचेचाळीस ते साठ दिवसांच्या काळात दिसतो. या बुरशीच्या संसर्गामुळे पानांवर करपा रोगासारखे डागही दिसू शकतात.

यावर उपाय काय?

तुमच्या शेतात कपाशीवर असे लक्षणं दिसताच, ते रोप उठवून शेताबाहेर नेऊन नष्ट करावे. तसेच, ज्या ज्या झाडावर याचे लक्षण दिसत आहेत, त्याच्या बुंध्याजवळ ट्रायकोडर्मा पन्नास ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणात आळवणी करावी.

Related Posts

देवगाव रंगारी शाळेत धक्काबुक्कीतून चाकूहल्ला; दहावीच्या विद्यार्थ्याने चार जणांवर केले वार, एक गंभीर

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील देवगाव रंगारी येथील शाळेत किरकोळ कारणावरून दहावीच्या विद्यार्थ्याने पॉकेट चाकूने चार वर्गमित्रांवर हल्ला केला. एकाची…

ByByrushikesh Aug 8, 2026

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर टोलेबाज हल्ला; कुणबी प्रमाणपत्र रद्द प्रकरणी बावनकुळेंना नार्को टेस्टचे आव्हान

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी कुणबी प्रमाणपत्र रद्द प्रकरणी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मुख्यमंत्री देवेंद्र…

ByByrushikesh Aug 8, 2026

गोबरधन योजना 2026: शेतकऱ्यांसाठी सोन्यासारखी संधी, शेणातून मिळवा अतिरिक्त उत्पन्न

केंद्र सरकारने २३,७३१ कोटी रुपयांची ‘गोबरधन’ राष्ट्रीय चक्राकार जैव-ऊर्जा योजना मंजूर केली. शेतकरी शेण विकून कमवू शकतात अतिरिक्त…

ByByrushikesh Aug 8, 2026

महाराष्ट्रात मुसळधार पाऊस; धरणे ओव्हरफ्लो, जायकवाडी ९५% भरले, हवामान विभागाचा काय अंदाज?

राज्यात सातत्याने कोसळत असलेल्या पावसाने धरणांची पातळी वाढली आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरीसह मुंबई-पुण्याला दिलासा. जायकवाडी धरण ९५% भरले. आता…

ByByrushikesh Aug 7, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top