• Home
  • Agriculture
  • महाराष्ट्रात ३ ते ७ जुलै दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता
Image

महाराष्ट्रात ३ ते ७ जुलै दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता

हवामान विभागाच्या शास्त्रज्ञ एस. डी. सानप यांनी ३ ते ७ जुलै दरम्यान महाराष्ट्रात सर्वदूर पावसाचा अंदाज वर्तवला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

महाराष्ट्रात या आठवड्यात मुसळधार पाऊस

आता राज्यातील सर्व भागात पाउस सक्रीय झाला आहे, त्यामुळे शेतकऱ्यामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. अनेक ठिकाणी पेरणीच्या कामांना वेग आला आहे, मात्र काही काही भागात अजूनही चांगल्या पावसाची वाट पहिली जात आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने दिलेल्या नवीन अंदाजाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. हवामान अंदाजानुसार ३ ते ७ जुलै या कालावधीत राज्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

बंगालच्या उपसागरात पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने पावसाची शक्यता वाढली.

एलनिनोचा प्रभाव वाढल्याने मान्सून चा पाऊस कमी पडण्याची शक्यता वर्तवली जात असली तरी मात्र बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. यामुळे पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. शास्त्रज्ञ सानप यांच्या मते, या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील अनेक भागांत चांगला पाऊस होऊ शकतो. विशेषतः किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.

ऑरेंज अलर्टची घोषणा; विदर्भ-मराठवाड्याकडे लक्ष

हवामान विभागाने विदर्भ आणि मराठवाड्यात ऑरेंज अलर्ट दिला आहे. या भागात ३ ते ७ जुलै दरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचबरोबर कोकण आणि घाटमाथ्यावर देखील जोरदार पावसाचा अंदाज आहे. या काळात वाऱ्याचा वेगही वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे समुद्रकिनारी मासेमारीला बंदी घालण्याचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

एल निनोचा परिणाम कायम ? पुढील वर्षीही परिणाम दिसणार ?

यावर्षी एल निनोमुळे मान्सून काहीसा कमकुवत राहिल्याचे दिसत आहे. हवामान विभागाने याआधीच या बद्दल इशारा दिला होता. मान्सूनचे वारे कमकुवत असून, त्याचा परिणाम यंदाच्या पावसाच्या प्रमाणावर दिसून येतो आहे. शास्त्रज्ञ सानप यांच्या माहितीनुसार, एल निनोचा परिणाम पुढील वर्षीही राहण्याची शक्यता आहे. मात्र, पुढील वर्षी नेमका किती पाऊस पडेल, याबद्दल सध्या कोणताही अचूक अंदाज सांगता येणार नाही. हवामानातील बदलत्या परिस्थितीचा अभ्यास सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Related Posts

LPG e-KYC: एजन्सी पैसे मागतेय? एक पैसाही देऊ नका; 30 सप्टेंबरपर्यंत हे काम कराच

आधार आधारित बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन (BAA) 30 सप्टेंबर 2026 पर्यंत पूर्ण करणे अनिवार्य; 1 ऑक्टोबरपासून सबसिडीयुक्त सिलिंडरसाठी आधार ऑथेंटिकेशन…

ByByrushikesh Sep 24, 2026

मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय! लाऊडस्पीकर वाजवायचा असेल तर मंडळांना जमा करावे लागणार 1 लाख रुपये

मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! लाऊडस्पीकर वापरण्यासाठी मंडळांना 1 लाख रुपयांची अनामत रक्कम भरावी लागणार मुंबई: गणेशोत्सवासह सर्व…

ByByrushikesh Sep 24, 2026

‘नो युपीआय डे’: 2 ऑक्टोबरला क्यूआर कोड काळ्या कापडाने झाकणार; महाराष्ट्रासह देशभरातील 500 हून अधिक व्यापारी संघटना आंदोलनात

एमडीआर शुल्काच्या विरोधात देशभरातील व्यापारी संघटनांचे आंदोलन; गांधी जयंतीला क्यूआर कोड काळ्या कापडाने झाकून ‘गांधीगिरी’चा मार्ग मुंबई: युपीआय…

ByByrushikesh Sep 24, 2026

धाराशिवमध्ये पवन ऊर्जा प्रकल्पांना चोरीचा मोठा फटका; ८ महिन्यांत २० कोटींचे साहित्य चोरीस, प्रकल्प वर्षभर लांबणीवर

धाराशिवमधील पवन ऊर्जा प्रकल्पांमध्ये ८ महिन्यांत २० कोटींचे साहित्य चोरीस गेल्याने प्रकल्प एक वर्ष लांबले. चोरी आणि तोडफोडीमुळे…

ByByrushikesh Sep 24, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top