शिवसेना ठाकरे गटातून खासदारांनी बंडखोरी केली. खासदारांच्या बंडखोरीनंतर शिवसेना नेते सचिन अहिर यांनी सुद्धा बंड पुकारला आणि ते शिंदे सेनेत गेले. राज्याच्या राजकारणात आता पुन्हा एकदा खूप मोठा भूकंप होणार असून ठाकरे गटाचे तब्बल पंधरा आमदार बंडखोरी करण्याच्या तयारीत असल्याचा दावा हिंदुस्थानी भाऊ यांनी केला आहे. सोबतच त्यांनी तारीख सुद्धा सांगितली आहे.
काल उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर आमदारांची बैठक बोलावली!
शिवसेनेच्या सहा खाजदारांनी साथ सोडली, अनंतर आमदार सचिन आहीर यांनी सुधा ठाकरे यांची साथ सोडली. त्या मुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला होता. अजूनही काही आमदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असून, ते मोठी बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत . त्याचमुळे काल उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर सर्व आमदारांची बैठक बोलावली होती. पण या बैठकीला परभणीचे आमदार राहुल पाटील उपस्थित नव्हते.
७ सप्टेंबरला उद्धव ठाकरे गटातून मोठी बंडखोरी होणार ?
रील स्टार हिंदुस्थानी भाऊ यांनी सांगितले की, सात तारखेला उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून आमदार मोठी बंडखोरी करणार आहेत. तसेच, या दरम्यान त्याने संजय राऊत यांच्यावर टीका केली. शेवटी, हिंदुस्थानी भाऊ आपल्या व्हिडिओमध्ये म्हणाला, “उद्धव साहेब, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. माहितीये ना? मी मध्ये बोलले होतो ना?” सांभाळा, नाहीतर पंधरा आमदार आणि उरलेले पंचवीस नगरसेवक सुद्धा जाण्याच्या मार्गावर आहेत.















